शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडच्या वरचेगावात पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

चांदवड : शहरातील वरचेगावात प्रभाग क्रमांक तीन, नऊ व दहामधील लोहार गल्ली, हत्तीखाना, ब्राम्हण गल्ली, पाटणी गल्ली, डांबरविहीर परिसर, ...

चांदवड : शहरातील वरचेगावात प्रभाग क्रमांक तीन, नऊ व दहामधील लोहार गल्ली, हत्तीखाना, ब्राम्हण गल्ली, पाटणी गल्ली, डांबरविहीर परिसर, पंचशीलनगर, बागवानपुरा, देवी रोड, शिंपी गल्ली, हनुमाननगर, बोरसे गल्ली, रंगमहाल परिसर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्वरित याबाबत दखल घ्यावी असे निवेदन नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित कदम यांची भेट घेऊन नागरिकांनी निवेदन दिले.

वरचे गावातील पाण्याचे स्रोत कमी असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या कोरोना महामारीत हातपंपावर महिलांना पाणी भरण्यासाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण तातडीने उपाययोजना करून वरचेगावातील पाणीपुरवठा चार-पाच दिवसांवर करावा. या उपरही काही उपाययोजना केल्या नाही तर शिवसेना व वरचे गावातील सर्व नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. निवेदनावर शिवसेना उप-शहरप्रमुख सचिन खैरनार, अ‍ॅड. विशाल व्यवहारे, गणेश जगताप, रूपेश अजमेरा, गणोश लहरे, गणोश खैरनार, सागर बर्वे, भूषण कोकंदे, राजेंद्र आहेर, संजय जाधव, संदीप पवार, योगेश बोरसे, राजा सोमवंशी आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.

----------------------------------------------------------------------

चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांना पाणीटंचाईचे निवेदन देताना गुड्ड खैरनार, गणेश खैरनार, गणेश जगताप, भुषण कोंकदे, रूपेश अजमेरा व नागरिक. (२८ चांदवड १)

===Photopath===

280521\28nsk_35_28052021_13.jpg

===Caption===

२८ चांदवड १