शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कंधाणेचा जलकुंभ बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

जलकुंभाला बऱ्याच ठिकाणी भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. या जलकुंभाची अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याने गावातील नागरिकांच्या ...

जलकुंभाला बऱ्याच ठिकाणी भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. या जलकुंभाची अनेक दिवसांपासून साफसफाई झाली नसल्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याचा व सतत पडत असलेल्या भगदाडांमुळे जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जलकुंभाच्या ठिकाणी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभ मंजूर करण्यात यावा यासाठी स्थानिक प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी व सरकार दरबारी अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. पण याकडे संबधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कंधाणेवासीयांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कंधाणे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरम नदीच्या पाण्याचा वापर करावा लागत होता. वापरत असलेल्या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत होते. गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तत्कालीन स्थानिक प्रशासनाने १९७२ मध्ये गावात पाणीपुरवठा योजना राबवून या जलकुंभाची निर्मिती केली असल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी या जलकुंभाद्वारे संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. तेव्हापासून तर आजमितीस निम्म्या गावाचा पाणीपुरवठा या जलकुंभाद्वारे करण्यात येत आहे. बांधकामाला बऱ्याच वर्षांचा कालावधी लोटल्याने या जलकुंभाच्या वरच्या ठिकाणाचा स्लॅब काही ठिकाणी कोसळून मोठमोठी भगदाडे पडली आहेत. या भगदाडातून अनेक पक्षी पाण्यात पडत असून पाण्यातच सडत आहेत. वरचा भाग पूर्णत: धोकादायक बनल्याने या जलकुंभाची स्वच्छता करणे पाणीपुरवठा कर्मचारी वर्गाच्या जीवावर बेतू शकत असल्याने त्यांनीही सदर जलकुंभाची अंतर्गत स्वच्छता करणे बऱ्याच महिन्यांपासून बंद केली आहे. जलकुंभाचे बांधकाम जुन्या राहटीचे असल्याने जलकुंभावर वरती चढण्यास कोणतीही सुविधा नाही.

इन्फो

जीविताला धोका

जलकुंभ परिसरात नागरी वस्ती असून लहान बालके या ठिकाणी खेळत असतात. त्याचबरोबर जवळच प्राथमिक शाळा असल्याने बरेच विद्यार्थी या जलकुंभ परिसरातून जा-ये करत असतात. जलकुंभ जीर्ण झाल्यामुळे हा जलकुंभ केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. या जलकुंभाच्या ठिकाणी नवीन जलकुंभ मंजूर करावा अशी मागणी होत आहे.

कोट...

गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेला हा जलकुंभ जीर्ण झाला असून बऱ्याच ठिकाणी त्याला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. याच्यातून बऱ्याच ठिकाणाहून सतत पाणी झिरपत आहे. आधीच पाणीटंचाईमुळे गावाला एका दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असून त्यातच होणाऱ्या या पाणी गळतीमुळे अजून कमी पाणीपुरवठा नागरिकांना होत आहे. लवकरत लवकर नवीन जलकुंभाची निर्मिती व्हावी.

संजय बिरारी

संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

कोट....

नवीन जलकुंभाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला असून सर्व परिस्थितीची कल्पनाही संबधितांना कथन केली आहे. पण अद्यापपावेतो कोणताही मंजूर आदेश प्राप्त नाही. जीर्ण बांधकामामुळे या जलकुंभाची अंतर्गत साफसफाई करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

- सतीश मोरे, ग्रामसेवक, कंधाणे

फोटो- ०४ कंधाणे वॉटर

कंधाणे येथील धोकादायक जलकुंभ.

040721\04nsk_15_04072021_13.jpg

फोटो- ०४ कंधाणे वॉटर कंधाणे येथील धोकादायक जलकुंभ.