शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा खोलीकरणाच्या कामात सापडला पाण्याचा झरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 00:02 IST

चिंचोली : जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

 नायगाव : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सध्या सर्वत्र बंधारे खोलीकरणाची कामे जोमात सुरू आहेत. अशाच प्रकारचे काम सिन्नर तालुक्यातील चिंचोली गावात सुरू असताना चक्क पाण्याचा झराच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असताना सापडलेल्या या झऱ्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे.सर्वत्र भीषण दुष्काळाच्या झळा जाणवत असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याची परिस्थिती आहे. दुष्काळाचे हे चित्र बदलण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांबरोबर गाव व परिसरातील पाणी साठवण क्षेत्राच्या दुरुस्तीबरोबर बंधाऱ्यांमध्ये साचलेला गाळ काढून साठवण क्षमता वाढवण्याचे काम लोकसहभागाद्वारे करण्याचा सपाटा लावला आहे. सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथेही माजी सरपंच संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवडाभरापासून गाव व शिवारातील सर्वच नाले व बंधारे गाळमुक्त करण्याचे काम ग्रामस्थांच्या सहभागातून सुरू आहे. चिमट्याच्या मळ्यातील बंधाऱ्यात काम सुरू असताना सुमारे सहा-सात फूट गाळ काढून झाल्यावर मातीचा ओलावा जाणवू लागल्याने काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळातच खोदलेल्या खड्ड्यात बऱ्यापैकी पाणी साठल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा गाळ काढण्याचे काम सुरू केल्यानंतर याठिकाणी पाण्याचा झरा आढळून आला. ही सुखद बातमी वाऱ्यासारखी चिंचोली परिसरात पसरताच चिमट्याच्या मळ्यातील बंधाऱ्यावर झरा पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. तीव्र टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असताना हाती लागलेल्या या झऱ्यामुळे आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आले. या झऱ्यामुळे सध्या तरी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परिसरातील सर्वच बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढणार असून, सिंचन क्षेत्रात वाढ होऊन पाणी पातळी वाढण्याचे काम होणार आहे. माजी सरपंच संजय सानप, सरपंच सुनीता सानप, उपसरपंच संगीता भोळे, पोलीसपाटील मोहन सांगळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष राजू नवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू नवाळे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ झाडे, नितीन आव्हाड, बाळू सानप, प्रवीण लांडगे, दौलत झाडे, प्रकाश नवाळे, नितीन नवाळे, नामदेव हुल्लळे, संदीप भाबड, शरद सानप, अशोक गिते आदिंसह ग्रामस्थ जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसाठी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)