शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी दंड, व्याजासह वसूल करता; मग बाराही महिने पाणीपुरवठा करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:09 IST

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? असा संतप्त सवाल त्र्यंंबकवासीयांनी केला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकवासीयांची मागणी, दिवसाआड पाणी पुरवठ्याने संताप

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात वसूल न केलेली घरपट्टी, पाणीपट्टी अक्षरशः दंड व व्याजासह यावर्षी वसूल केली जात आहे. ही पाणीपट्टी बाराही महिन्यांची घेतली जाते तर मग बाराही महिने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची नाही काय? असा संतप्त सवाल त्र्यंंबकवासीयांनी केला आहे.नगरपरिषदेच्या एका परिपत्रकात अंबोली धरणाचे पाणी कमी झाल्याने येत्या २१ एप्रिलपासून दिवसाआड फक्त ४५ मिनिटे पाणीपुरवठा झोन पध्दतीने करण्यात येणार आहे. वास्तविक दर सिंहस्थ कुंभमेळ्यात पाणीपुरवठा योजनेच्या अंबोली व गौतमी गोदावरी (बेझे) धरणाचे त्र्यंबकेश्वरसाठी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर बेझे धरणावर त्र्यंबकेश्वरसाठी २७ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना करून आगामी २५ वर्षे एक लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा अंबोली व बेझे येथे पुरेल, अशी तरतूद नगरपरिषदेने केली आहे.दोन दोन धरणे अधिक पालिकेचे स्वतःचे अहिल्या धरण असताना दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. जे अंबोली लघुपाट धरण नाशिक इरिगेशनच्या ताब्यात आहे ते म्हणतात, जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल. या शिवाय गौतमी प्रकल्प हाताशी आहे. त्यातही भरपूर पाणी असताना त्र्यंबक साठी सध्या १० टक्के आरक्षण असताना शहरासाठी आरक्षण वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरGovernmentसरकार