शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 24, 2016 10:11 IST

गुरुकृपानगर परिसरात तब्बल १८ दिवसांनी नळाला पाणी आले. पण मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

 नांदगाव : शासकीय स्तरावर पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांनी नागरिकांना आवाहन केले जात असले व दंडात्मक कारवाईची तरतूद असली तरी, नांदगाव नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदोष यंत्रणेतून वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी त्यांच्यावर कोणी कारवाई करावी? याबाबत गुरुकृपानगरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.गुरुकृपानगर परिसरात तब्बल १८ दिवसांनी नळाला पाणी आले. पण मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. काही ठिकाणी गरजेपोटी नागरिकांनी रांग लावून वाया जाणारे पाणी उपसून भरले. विशेष म्हणजे नदीतून जाणारी जलवाहिनी वारंवार फुटते म्हणून, नवीन सुरक्षित वाहिनी नदीच्या पुलावरून टाकण्यात आली. तर तीदेखील फुटल्याने बरेचसे पाणी नदीत वाहून गेले.जेटीके इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागे फुटलेल्या वाहिनीतून वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळात लहान मुलांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला तर तिथून ४० ते ५० फूट अंतरावर जमिनीतून पाणी वर येत होते. त्यापुढे पुढच्या ४० ते ५० फुटांवर गळतीमधले पाणी भांड्याकुंड्यांनी भरले गेले. त्याहीपुढे पाणी गळतच होते.एरवी पाण्याच्या अडचणींसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कोर्टात, चेंडू टोलविणाऱ्या नगरपालिकेस अद्याप गुरुकृपा नगरातील पाणीपुरवठ्याचे सूत्र सापडलेले नाही. शहरात ३५०० कनेक्शन्स आहेत. एकूण ३९ भाग आहेत. येथे केवळ १९० नळ कनेक्शन्स आहेत आणि पाणीपुरवठ्याचे आठ भाग आहेत. त्यांना १८ ते २० तास पाणीपुरवठा करावा लागतो. या वेळात कितीतरी पाणी वाहून जाते. कोणाच्या बगिच्याला तर कोणाला गाड्या धुण्यासाठी मनमुराद पाणी उपलब्ध होते. लातूर येथे तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या प्रशासनास तहानलेल्या नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी १४४ कलम लागू करावे लागले. पण पाण्याची कृत्रिम टंचाई, योजना राबविणाऱ्यांच्या चुकांमुळे निर्माण होत असेल तर कोणते कलम लावावे याची चर्चा शहरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)