शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी संप्रदाय विश्वधर्म व्हावा

By admin | Updated: September 20, 2015 23:52 IST

संतसंमेलनात विचारमंथन

नाशिक : साधुग्राममधील जगद्गुरू स्वामी हंसदेवाचार्य यांच्या जगन्नाथ धाममध्ये संत गुलाबराव महाराज यांच्या शतक समाधी महोत्सवानिमित्त वारकरी संप्रदायाची ओळख देशभरातील भाविकांना व्हावी, यासाठी वारकरी संप्रदायाची परंपरा, उपासना, तत्त्वज्ञान याविषयांवर संतसंमेलनात विचारमंथन झाले. त्यात वारकरी संप्रदाय विश्वधर्म व्हावा, असा सूर उपस्थित संतांकडून व्यक्त करण्यात आला. वारकरी संप्रदाय विश्व धर्मास पात्र आहे. महाराष्ट्र संतांची भूमी असून, सर्व विषयांचे वाङ्मय स्वरूप त्यात समाविष्ट आहे. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचे गोविंदगिरीजी महाराज यांनी सांगितले. पंढपूर वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. तसेच कीर्तन आणि भजनाची महत्त्वाची परंपरा आहे. सर्व संप्रदायांची उपासना वारकरी संप्रदाय करत असल्याचे रामेश्वरशास्त्री यांनी सांगितले. संत साहित्य वाङ्मय लोकसंवादी असल्याचे कृष्णदास महाराज लहवितकर यांनी सांगितले. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक याठिकाणीही वारकरी संप्रदायाचे अनुयायी असल्याचे रामदास महाराज बळी यांनी म्हटले. जगन्नाथ धाममध्ये स्वामी हंसदेवाचार्य यांच्या जगन्नाथ धाममध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरा, तत्त्वज्ञानावर विचारमंथन करण्यात आले. संमेलनाला महामंडलेश्वर जनार्दन हरि गिरीजी महाराज, प्रकाश महाराज, महामंडलेश्वर अमृतदासजी महाराज, ईश्वरदासजी महाराज, रामदासजी महाराज, ऋषिकेश महाराज, हिंदू जनजागृती समितीचे चारूदत्त पिंगळे आदि उपस्थित होते.