शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडाचा ट्रक उलटून १८ जखमी

By admin | Updated: May 12, 2017 02:03 IST

नाशिकरोड : नाशिक तालुक्यातील शिलापूर येथून लग्न समारंभ आटोपून हिंगणवेढे येथे परतणाऱ्या वऱ्हाडींचा टेम्पो गुरुवारी दुपारी सव्वा वाजता उलटल्याने १८ जखमी झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिक तालुक्यातील शिलापूर येथून लग्न समारंभ आटोपून हिंगणवेढे येथे परतणाऱ्या वऱ्हाडींचा टेम्पो गुरुवारी दुपारी सव्वा वाजता उलटल्याने १८ जखमी झाले आहेत. जखमींवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून यामध्ये चौघा लहान मुला-मुलींचा समावेश आहे.नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे येथील विष्णू अशोक धात्रक व परळी जवळील सांडगाव येथील जयश्री सुदाम घुटे यांचा गुरुवारी दुपारी शिलापूर गावात लग्न समारंभ होता. लग्न समारंभ व जेवण आटोपल्यानंतर हिंगणवेढ्याचे वऱ्हाडी यांना घेऊन टेम्पोचालक (एमएच १२ एफए ८१४०) हा एकलहऱ्याजवळील गंगापाडळी येथून हिंगणवेढे येथे येत होता. दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास हिंगणवेढे गावाच्या एक किलोमीटर पहिले नागमोडी रस्त्यावर रस्ता ओलांडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या बेतात अचानक करकचून ब्रेक मारल्याने टेम्पो पलटी झाला. टेम्पो पलटी झाल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी, येणारे-जाणारे वाहनधारक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना टेम्पोमधून बाहेर काढले. त्यानंतर तीन-चार गाड्यांमधून जखमींना मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.टेम्पो उलटल्याने सुमन सोनवणे (३८), अलका पवार (४८), कमळाबाई पवार (५८), मीरा मोरे (४५), राधाकृष्ण पवार (२८), बाबुजी धात्रक (६५), योगेश मोरे (१८), करिना पवार (११), कमळाबाई विंचू (६०), भागाबाई मोरे (६५), निवृत्ती वाघ (७०), कारभारी धात्रक (७०), दीपक खेताडे (१८) या १३ जणांना जास्त मार लागल्याने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अर्जुन पवार (१२), गंगू पवार (४३), जयश्री सोनवणे (१७), सुधीर कापसे (११), मंगल पवार (१२) या पाच जणांना किरकोळ मार लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते जगदीश पवार, भाजपाचे बाजीराव भागवत, शांताराम घंटे, नगरसेवक सीमा ताजणे, पंडित आवारे, अंबादास पगारे आदिंनी रुग्णालयात अपघात ग्रस्त जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देत नातेवाइकांना धीर दिला.