शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची परिसरातून ‘वरात’

By admin | Updated: May 15, 2017 00:57 IST

नाशिक : भाडेतत्त्वावर दुचाकी घेत सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या पेठरोडवरील अश्वमेधनगरातील सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भाडेतत्त्वावर दुचाकी घेत सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या पेठरोडवरील अश्वमेधनगरातील सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या ‘श्रीमंत’ चोरट्यांची परिसरातून रविवारी (दि.१४) ‘वरात’ काढली.पादचारी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं हिसकावून आपले ‘भाग्य’ उजळविण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार किरण छगन सोनवणे (वय २२, रा. अश्वमेधनगर) याचा पंचवटी पोलिसांनी जेव्हा माग काढला तेव्हा त्याची तीन मजली आलिशान इमारत बघून पोलीसही चक्रावले. जेव्हा साध्या वेशातील पोलिसांनी जेव्हा त्याच्या इमारतीच्या तळमजल्यावरील उंबरा ओलांडला आणि घरात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले तेव्हा घरात असलेल्या चैनीच्या महागड्या ब्रॅण्डेड वस्तू बघून पोलीस अवाक् झाले. घरात कोणीही कमावते नसल्याने आलिशान इमारतीच्या या ‘श्रीमंत’ सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद करून गुन्ह्यात खांद्याला खांदा लावून मदत करणारा त्याचा साथीदार विलास राजू मिरजकरच्या (वय २७, रा.लक्ष्मणनगर) मुसक्या आवळल्या. या दोघांचीही पोलिसांनी ‘वरात’ काढून परिसरातील रहिवाशांसमोर पितळ उघडे पाडले. या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने येत्या मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरीचे गंभीर गुन्हे म्हसरूळ, पंचवटी, येवला पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी सोनवणे याच्या राहत्या घरातून सुमित्रा बच्छाव यांची चोरलेली सोनसाखळी हस्तगत केली आहे.