शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

लोहोणेर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू ...

लोहोणेर : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत घडली आहे. देवळा तालुक्यातील सावकी येथील सोनवणे कुटुंबीय गाढ झोपेत असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या पठाण कचरू सोनवणे यांचे मातीचे घर आहे. काल गुरुवारी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या भितींत पाणी मुरल्याने सदर घराची भिंत रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. घरामध्ये गाढ झोपेत असलेले पठाण सोनवणे त्यांची पत्नी सुनीता सोनवणे यांचा पाच वर्षीय मुलगा आकाश सोनवणे व सात वर्षीय मुलगा कुणाल सोनवणे यांच्या अंगावर ती भिंत कोसळली. घर कोसळल्याचा आवाज ऐकून शेजारी व आजूबाजूचे ग्रामस्थ धावत आले व ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्वांना त्यांनी घराबाहेर काढले. यामध्ये तिघांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना पाच वर्षीय आकाश या चिमुकल्याचा रस्त्यात मृत्यू झाला तर सुनीता पठाण सोनवणे (२७) व कुणाल पठाण सोनवणे (७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पठाण सोनवणे (२९) याला किरकोळ दुखापत झाली आहे.

--------------

घटनास्थळाची पाहणी

घटनास्थळी देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व सोनवणे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सावकी येथील तलाठी कल्याणी कोळी व ग्रामसेवक वैशाली पवार यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून शासनाने दुर्घटनाग्रस्त सोनवणे कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सावकी ग्रामस्थांनी केली आहे.

-----------------

(१६ आकाश सोनवणे), सावकी येथे सोनवणे यांच्या घराची कोसळलेली भिंत. (१६ लोहोणेर १)

160721\16nsk_9_16072021_13.jpg

१६ लोहोणेर १/१६ आकाश सोनवणे