शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नागडे-बायपास रस्त्याची झाली चाळण

By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST

दिशादर्शक फलक अस्पष्ट : नाशिककर जातात भारमकडे

येवला : नागडे बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली असून, ग्रामस्थांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्ग उड्डाणपुलाचे काम कोटमगाव रेल्वे गेटजवळ सुरू आहे. या महामार्गाची सर्व वाहतूक नागडे या गावावरून वळविण्यात आली आहे. नागडे-कोटमगाव हा रस्ता अरुंद व एकेरी आहे. अवजड मालवाहतूक, बस व प्रवासी सर्व प्रकारची सुमारे १४०० ते १५०० वाहने रोज याच रस्त्याने ये-जा करतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने नागडे ते कोटमगावदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे खासगी वाहने आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच नाशिककडून औरंगाबादला जाणाऱ्या वाहनांसाठी नागडे गावात लक्ष्मीदेवी मंदिराजवळ दिशादर्शक फलक अस्पष्ट व चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे अनेक वाहने भारमपर्यंत निघून जातात. असे रस्ता चुकण्याचे प्रकार रोज घडत आहे. काही दिवसांपूर्वी लोखंडी भंगार घेऊन जाणारा ट्रक खराब रस्त्यामुळे पलटी झाला होता. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. रस्त्याची सुधारणा संबंधित विभागाकडून तात्पुरती माती टाकून करण्यात आली होती; परंतु पावसामुळे त्याच खड्ड्यांमध्ये चिखल तयार होऊन अवजड वाहने रस्त्यातच फसून बसण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अनेक वेळा खोळंबादेखील होतो.भविष्यात या सर्व्हिस रस्त्यावर मोठा अपघात होऊ शकतो असे या रस्त्याच्या पाहणीवरून लक्षात येते. तरी या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)