शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मूलभूत सुविधांची प्रतीक्षाच

By admin | Updated: January 24, 2017 23:24 IST

राजकीय पक्षांची कबुली : एचपीटीत ‘राजकीय जनजागृती’ कार्यक्रम

नाशिक : शहर केवळ स्मार्ट सिटी होऊन उपयोग नाही, नागरिक ‘स्मार्ट’ झाले तरच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल, असे मत विविध पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. नाशिकच्या मूलभूत समस्या अजूनही ‘जैसे थे’ असल्याची कबुली महापालिकेत आलटून पालटून सत्तेवर असणाऱ्या पक्षांच्या प्रतिनिधींनी दिली. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार मुक्त कारभाराची ग्वाही एचपीटी महाविद्यालयात आयोजित ‘राजकीय जनजागृती’ कार्यक्रमात दिली.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि मनसेचे गटनेते अनिल मटाले सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल मटाले यांनी गेल्या पाच वर्षांत पूर्ण केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला तसेच १५ ते २० वर्षांत जी विकासकामे झाली नाहीत ती ४० महिन्यांत केली असल्याचा दावा केला. महानगरपालिकेला अठरा महिने आयुक्त मिळाला नसल्याची अडचण त्यांनी पुढे केली.  यावेळी सावजी यांनी शहराचा विकास हेच भाजपाचे ध्येय असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकांमध्येदेखील ‘गुड गव्हर्नन्स’ निर्माण करण्याचा भाजपा पक्षाचा संकल्प असल्याचे सांगितले.  पक्षाची ध्येय धोरणे सांगताना लक्ष्मण सावजी यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि प्रशासनावर अंकुश ठेवणार असल्याचे सांगितले. शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नाशिक शहराचा विकास करण्याचा मानस असल्याचे सांगितले. तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचा जगभर नावलौकिक असला तरी पर्यटनाच्या माध्यमातून या शहराची नवीन ओळख करून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले, तर आभार प्रा. रमेश शेजवळ यांनी मानले. न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मेधा सायखेडकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)