शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी गुणवत्तेचे निमित्त करून वेतन कपातीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:14 IST

नाशिक : शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केल्यानंतर शिक्षकांच्या कामाच्या मूल्यमापनावर आधारित वेतन देण्यासंदर्भातील शासन निर्णय यापूर्वीच रद्द करण्यात ...

नाशिक : शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केल्यानंतर शिक्षकांच्या कामाच्या मूल्यमापनावर आधारित वेतन देण्यासंदर्भातील शासन निर्णय यापूर्वीच रद्द करण्यात आला होता. तरी आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित वेतन देण्यासंदर्भात शासनस्तरावर विचार सुरू असल्याने शिक्षक संघटनांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून शिक्षकांचे वेतन निश्चित करण्याला विरोध केला असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे निमित्त करून शिक्षकांच्या वेतन कपातीचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे.

शिक्षकांच्या वेतनाबाबत शासनाची वक्रदृष्टी असल्याचा आरोप वेगवेगळ्या शिक्षक संघटनांकडून होत असून मागील वर्षी कपात केेलेले २५ % वेतन प्रलंबित अतानाच, वेतन आयोगाची थकबाकी, महागाई भत्ता थकबाकी, वैद्यकीय बिले, भविष्य निर्वाह निधी व्याज, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची देणी अशा वेगवेगळ्या प्रकारची शिक्षक व शिक्षकेतर यांची देणी प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या वेतनास कात्री लावण्यासाठी एक त्रयस्थ संस्थेची नेमणूक करून एक चाचणी किंवा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थांची गुणवत्ता कशी ठरवणार असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

कोट-

सर्व विद्यार्थ्यांची आकलन शक्ती एकसमान नसते. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनासंदर्भात विद्यार्थी गुण‌वत्तेचा निकष लावणे योग्य ठरणार नाही. शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांसाठी पूर्ण क्षमतेने अध्यापन करीत असतो. त्यात त्यात तो कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे या निर्णयाला सर्व शिक्षक संघटनांचा विरोध असेल.

-राजेंद्र निकम, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक महासंघ

-----

सर्वच विद्यार्थ्यांची बैद्धिक पात्रता भिन्न असते. शिक्षक त्याचा शंभर टक्के प्रयत्न करीत असतात. सर्व विद्यार्थी शिक्षकांसाठी एकसमानच असतात. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना एकसारखेच समजते असे नाही, मूल्यमापन एक समानच येईल असे नाही. त्यामुळे शासनाच्या विचाराधीन असलेला निर्णय अयोग्य आणि मानसशास्त्राला धरून नाही.

- नीलेश ठाकूर, सरचिटणीस टीडीएफ नाशिक

-- चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन नकोच, आधीच अनेक विनाअनुदानित माध्यमिक शिक्षक २० ते ४० टक्के अनुदानावर काम करीत आहेत, शिक्षण सेवक, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, ग्रामीण आणि शहरी यात शैक्षणिक तफावत कधीही मिटू शकणार नाही, त्याला अनेक कारण आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चाचण्यांवरून शिक्षण मूल्यमापन करणे अयोग्य आहे.

- संजय पवार उपाध्यक्ष:- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद