शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्यांमध्ये घोळ

By admin | Updated: September 16, 2015 23:14 IST

चांदवड नगर परिषद : दुरूस्तीची मागणी

चांदवड : चांदवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या असून, त्या मतदार याद्यांमध्ये सर्वच्या सर्व १ ते १७ प्रभागातील याद्या चुकीच्या असून, बाहेरील मतदारांचा समावेश केल्याने सर्वच प्रभागातील मतदार याद्यांना हरकत घेण्यात आली असून, या याद्या त्वरित सुधारित कराव्यात, अशी मागणी चांदवड शहर शिवसेनेचे शहरप्रमुख जगन्नाथ राऊत यांनी चांदवड नगर परिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नगर परिषदेचे मंजूर प्रभाग रचनेप्रमाणे व लोकसंख्येनुसार समान मतदारसंख्या नसल्याने तसेच चुकीची मतार यादीस शिवसेनेच्या वतीने हरकत घेण्यात आली. या मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. जे मतदार चांदवड शहरातून बदलून गेले, काही मतदार मयत झाले तर काही मतदार या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात राहण्यास गेले त्यांची नावे इतरत्र आहेत. तर काहीची नावेच नाही असा प्रकार घडल्याने सर्र्र्वत्र नाराजीचा सुर आहे. मतदार याद्या या कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. चांदवड नगरपरिषदेची निवडणुक २०१५ च्या मंजुर प्रभाग रचनेप्रमाणे मतदार यादी नसून त्यामध्ये प्रभागाबहेरील मतदारांचे नावाचा समावेश करुन तसेच चांदवडच्या बाहेरील मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. सदरच्या याद्या प्रभाग रचनेनुसार तसेच प्रभागात वास्तवास असलेल्या मतदारांचाच समावेश करावा तसेच प्रभागाबाहेरील व चांदवड शहराबाहेरील मतदारांचे नावे वगळुन पुनश्च प्रभाग रचनेनुसार समान मतार संख्येचे प्रभाग बनवावे अशी मागणी जगन्नाथ राऊत यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)