शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात पथनाट्याव्दारे मतदार जागृती

By admin | Updated: January 25, 2017 00:45 IST

येवल्यात पथनाट्याव्दारे मतदार जागृती

येवला : ‘ऐका हो ऐका, मतदारांनो ऐका, माता-भगिनींनो ऐका, मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही तेवढं बघून घ्या, बरं का, ऐका हो ऐका !’ हे शब्द मंगळवारी येवल्यातील चौकाचौकात प्रत्येकाच्या कानावर पडत होते, निमित्त होते पथनाट्याचे. स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे संस्कृतशिक्षक डॉ. प्रसाद शास्त्री कुळकर्णी यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘आमुची लोकशाही महान...’ हे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर करत येवलेकरांची मने जिंकून घेतली. यावेळी तहसीलदार नरेशकुमार बहिरम, नायब तहसीलदार आर. के. मालपुरे, श्रीगुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्र माचे प्रमुख अशोक सोमवंशी, प्रा. डॉ. मनीषा गोसावी, प्रा. आशा डांगरे, प्रा. दीपक खरे, पं. डॉ. कुळकर्णी उपस्थित होते. जागरूक मतदार असेल तरच लोकशाही बळकट होईल. मतदानप्रक्रि या नवमतदारांनी समजून घ्यावी. मतदान हा ‘अधिकार आणि कर्तव्य’ अशा एकाच नाण्याच्या बाजू आहेत, असे विचार या पथनाट्यातून मांडण्यात आले. भारत निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्याकरिता या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले होते. पथनाट्याचा समारोप बसस्थानक परिसरात झालेल्या छोटेखानी कार्यक्र मात तहसीलदार बहिरम यांच्या भाषणाने झाला. युवक-युवतींनी विविध समस्या मांडल्या. विविध शंकांचे बहिरम आणि इतर अधिकाऱ्यांनी निरसन करून मार्गदर्शन केले. निवडणूक शाखेचे चेतन बनसोडे यांनी आभार मानले. (वार्ताहर) स्वामी मुक्तानंद महाविद्यालयातील अकरावी इयत्तेतील व्यवसाय अभ्यासक्र माच्या पूजा काळे, शुभांगी सोनवणे, सारिका दाणे, प्रियंका दाणे, गायत्री कपुरे, दुर्गा दाभाडे, मनीषा सोनवणे, राणी भोकरे, लक्ष्मी भालेराव, रेश्मा पवार, अंजली हजारे, भारती काथवटे, निराक्षी पवार, योगेश साळवे, राकेश शेळके, वैभव खैरनार आणि अश्विनी माळोकर यांनी मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य शहरातील विविध चौकांमध्ये सादर केले. दर्जेदार आणि कसदार संवाद, उत्कृट अभिनय आणि सोपे व मजेदार संवादांमुळे पथनाट्याला अधिकच रंगत आणली.