शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल नामाची शाळा भरली..!

By admin | Updated: July 4, 2017 23:36 IST

नाशिक : विठूनामाचा गजर करत जिल्ह्यात विविध ठिकाणी दिंड्या काढण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गळ्यात तुळशीमाळा, कपाळी चंदनाचा टिळा, हातात टाळ, डोक्यावर तुळस वृंदावन घेऊन वारकरी व विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. विठूनामाचा गजर करत जिल्ह्यात विविध ठिकाणी दिंड्या काढण्यात आल्या.देवपूर विद्यालयपाथरे : सिन्नर तालुक्यातील देवपूर विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली.एकादशीनित्ति माजी विद्यार्थी व कीर्तनकार प्रसाद महाराज भागवत यांनी आषाढी एकादशी व वारीचे महत्त्व उदाहरणांसहित विशद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अनेक भजने, अभंग गायली. काढण्यात आलेल्या दिंडीत जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील चौकात रिंगण करून भजने, फुगडीचा आनंद घेतला. गावातील अनेक महिलांनी या सोहळ्यात भाग घेऊन भजने गायली तसेच फुगडीही खेळली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बाबा भागवतांचे दर्शन घेतले. गळ्यात टाळ, मृदंग, वीणा, भगव्या पताका असा मुलांचा वारकरी पेहराव होता, तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ‘रामकृष्ण हरी’चा जयघोष केला.यावेळी विद्या साळुंखे, सुमन मुंगसे, वैशाली पाटील, ताराबाई व्यवहारे, सुनील पगार, भीमराव आढांगळे, बाळासाहेब कुमावत, नानासाहेब खुळे, श्रीहरी सैंद्रे, प्रमोद बधान, दत्तात्रय आदिक, मीननाथ जाधव, शंकर गुरुळे, राजेश आहेर, गणेश मालपाणी, रवि गडाख, सोपान गडाख, विलास पाटील, नारायण भालेराव, सतीश गायकवाड, अशोक कळंबे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.पाथरे हायस्कूलमाध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित पाथरे हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी तसेच वृक्षलागवड सप्ताहांतर्गत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.