शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा दारू अड्ड्यावर हल्लाबोल

By admin | Updated: May 6, 2017 00:56 IST

कंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील गावठी दारूचा व्यवसाय बंद करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत करून तसे सटाणा पोलीस स्टेशन, तहसीलदार, राज्य उत्पादन विभागाला कळवूनही या अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून संबंधितांकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेल्याने येथील तरुणांनी एकत्र येत अवैध सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला दाद न देणारे पोलीस प्रशासन नागरिकांच्या दबावापुढे झुकले व घटनास्थळी भेट देत संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तेथून काढता पाय घेतला.येथे आदिवासी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचा व्यवसाय चालतो. या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होते. या दारूमुळे अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यात वापरण्यात येणारे रासायनिक घटक मानवी शरीरास अत्यंत घातक असून, त्यामुळे बऱ्यास नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना जीवघेण्या व्याधी लागल्या आहेत. या व्यवसाय परिसरात नेहमी तळीरामांची वर्दळ राहत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा उपद्रव सहन करावा लागत होता. गावात दि. १ मेच्या ग्रामसभेत गावतील अवैध गावठी दारूबंदीसाठी ठराव करण्यात येऊन, त्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली. याबाबतचा तपशील संबंधित विभागाला देऊन मदतीची मागणी करण्यात आली. ग्रामसभेत एकमुखी ठराव झाला. तरीही संबंधित व्यवसायिकांनी आपली मुजोरी कायम ठेवत सर्रास व्यवसाय चालूच ठेवला. संबंधित पोलिसांना याबाबत माहिती दिली तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीप्रमाणे येथील तरुणांनी सकाळी एकत्र येत संबंधित ठिकाणी छापा टाकत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य उद्ध्वस्त केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती केली. सुरुवातीला फोनवर दाद न देणाऱ्या पोलीस प्रशासनाने नागरिक आंदोलनाच्या तयारीत असताना घटनास्थळी दाखल होत गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन दिले व नागरिकांचा रोष शांत केला.