शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्तीच्या हालचाली

By admin | Updated: April 25, 2017 02:22 IST

नाशिक : तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्ती करण्यात येणार असून, प्रस्ताव ग्रामपंचायतींना पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 नाशिक : प्रत्येक घरापर्यंत वीज पोहचविण्यासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाचा भाग म्हणून तीन हजार लोकसंख्येच्या गावात ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्ती करण्यात येणार असून, तसे प्रस्ताव ग्रामपंचायतींना पाठवावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सर्वांसाठी वीज या धोरणाचा भाग म्हणून प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीच्या ठिकाणी वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यासाठी तीन हजार लोकसंख्येच्या भागात त्याच गावातील ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. संबंधित ग्रामपंचायत महावितरणी फ्रॅन्चायजी म्हणून काम करणार असल्याने या कामाच्या नियोजनासाठी ग्राम व्यवस्थापक नियुक्त करण्यात येणार आहे. प्रस्ताव महावितरणच्या विभागीय कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारच्या ऊर्जा व ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे एक गाव एक ग्राम विद्युत व्यवस्थापक ही योजना हाती घेतली आहे. विद्युत सहायकांची संख्या कमी झाल्याने ग्रामीण भागात वीज पुरवठ्यातील अडचणी सोडविण्यात येणारे अडथळे लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. मराठी विषय घेऊन इयत्ता दहावी उत्तीर्ण व आयटीआय (विद्युततंत्री) किंवा इलेक्ट्रीकल विषयात अधिक शिक्षण घेतलेले उमेदवार ग्राम विद्युत व्यवस्थापक या पदासाठी पात्र आहेत. (प्रतिनिधी)