शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मेरा शहंशाहे नासिक ऐसी शान वाला हैं... हुसेनी बाबा यांचा ३८८वा उरुस

By admin | Updated: April 25, 2017 16:49 IST

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून जुन्या नाशकातील हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची ...

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून जुन्या नाशकातील हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची बडी दर्गा ओळखली जाते. ‘शहंशाहे नासिक’ म्हणून प्रसिध्द असलेले हुसेनी बाबा यांचा वार्षिक यात्रोत्सव (उरूस) येत्या बुधवारपासून (दि.२५) सुरू होत आहे. यानिमित्त जुने नाशिकमधील बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या आदेशान्वये १५६८ साली म्हणजेच ४४७ वर्षांपुर्वी हुसेनी बाबा मदिना शरीफ येथून नाशिकमध्ये आल्याचे बोलले जाते. त्यावेळी पिंजारघाट, जोगवाडा हा परिसर जादुगारांची वसाहत म्हणून ओळखला जात होता कारण या परिसरात जादुगारांचे वास्तव्य मोठ्या संख्येने होते, असे बुजुर्ग मंडळी आजही सांगतात. जादुगारांकडून येथील सर्वसामान्य गरीब कष्टकरी नागरिकांवर अत्याचार केला जात होता. त्यांच्या छळाला येथील नागरिक कंटाळले होते, अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून या भागाला ‘जोगवाडा’ असे नाव पडले ते आजतागायत कायम आहे; मात्र आता या ठिकाणी नागरिक गुण्यगोविंदाने राहत आहे. हुसेनी बाबांच्या आगमणानंतर या परिसराचा कायापालट झाला. जादुगारांचे अस्तित्व बाबांनी आपल्या दैवी अध्यात्मिक ताकतीने (रूहानी) संपुष्टात आणल्याचे नागरिक सांगतात. तेव्हापासून आजतगायत बाबांच्या कृपाशिर्वादाने शहरात शांतता नांदत आली अूसन हजारो भाविक त्यांच्याशी जोडले गेले आहे.

बाबांकडे येणारे भाविक हे सर्वधर्मीय असल्यामुळे बाबांनी तेव्हापासूनच आपल्या शुध्द शाकाहाराचा स्विकार केला व आपल्या परिसरात देखील शाकाहार हाच महाप्रसाद असावा, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून आजही बाबांच्या बडी दर्गा परिसरात वांग्याची भाजी, खिचडी या खाद्यपदार्थाचा महाप्रसाद त्यांच्या भक्तांकडून वाटप केला जातो. ‘म्हणूनच एका प्रसिध्द कव्वालने नाशिकमध्ये जाहीर कव्वालीच्या मैफलित ‘मेरा शहंशाहे नासिक ऐसी शानवाला हैं...,’ ही कव्वाली सादर करून बांबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बडी दर्गा परिसरात बारा दिवसीय यात्रोत्सव (उरूस) साजरा केला जातो. दरम्यान, उरूसाच्या पहिल्या दिवशी सर्वप्रथम बाबांच्या मजारशरीफवर भद्रकाली पोलीस ठाण्याकडून मिरवणूकीद्वारे आणलेली चादर चढविली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. पहिली चादर चढविण्याचा मान परिसराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस प्रशासनाला विश्वस्त मंडळाकडून दिला जातो हे विशेष ! त्याचप्रमाणे संदल देखील साजरा के ला जातो. सर्वधर्मीय भाविक आजही मोठ्या श्रध्देने पिंजारघाटवरील बाबांच्या बडी दर्गाहमध्ये हजेरी लावतात. बडी दर्गाहच्या बांधकामाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे दर्ग्याच्या आतील बाजूस असलेल्या काचेच्या कोरीव नक्षीकामवर कुराणामधील लिहिलेले श्लोक (आयत) होय. मोठ्या घुमटाच्या आतील बाजूने संपुर्ण उंचीपर्यंत काचेचे आकर्षक असे कोरीवकाम दर्ग्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधून घेते. दर्ग्याला दोन स्वतंत्र प्रवेशद्वार असून एक द्वार फक्त पुरूषांसाठी व दुसरे महिलांसाठी राखीव आहे. दर्ग्याच्या आवारात भक्तांना शुचिर्भूत (वजू) करण्यासाठी पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मैदानात बडी दर्ग्याच्या जुन्या कौलारू वास्तूच्या आकारामध्ये सिमेंट कॉँक्रीटची आकर्षक पाणपोई उभारण्यात आली आहे. ही पाणपोई जुन्या बडी दर्ग्याच्या वास्तूची आठवण करून देते. शहराच्या हिंदू, मुस्लीम, सीख, ईसाई धर्माच्या एकात्मतेचे प्रतिक म्हणून बडी दर्गा ओळखली जाते. यावर्षी नव्यानेच दर्ग्याच्या तीन घुमटापैकी सर्वात मोठ्या मध्यभागी असलेल्या घुमटावर ‘कलश’ बसविण्यात आला आहे. अजमेर येथील प्रसिध्द सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्फ गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर असलेल्या कलशाची ही प्रतिकृती असल्याचे विश्वस्त व बाबांचे वंशज हजरत हाजी वसीम पिरजादा यांनी सांगितले.

 

 

https://www.dailymotion.com/video/x844w4w