शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- ४१ वर्षांपासून कैलास तांबट साकारतात ‘युनिक गणराय’

By admin | Updated: September 8, 2016 18:39 IST

माणसाला सकाळी उठल्यावर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत अशा सर्व वस्तुंचा खुबीने वापर करत नाशिकमधील रविवार पेठेतील चित्रकार कैलास तांबट यांनी यावर्षी ‘गुड मॉर्निंग गणेशा’ साकारला आहे.

अझहर शेख, ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. ८ -  माणसाला सकाळी उठल्यावर लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत अशा सर्व वस्तुंचा खुबीने वापर करत नाशिकमधील रविवार पेठेतील चित्रकार कैलास तांबट यांनी यावर्षी ‘गुड मॉर्निंग गणेशा’ साकारला आहे. त्यांची ही युनिक गणेशमुर्ती बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून तरुणाईला ‘सेल्फी’चा मोह आवरणे अवघड होत आहे.गायत्री मंदिराशेजारी राहणारे कै लास तांबट हे दरवर्षी एक आगळी संकल्पना निवडून त्याआधारे गणरायाची उभारणी करतात. १९७५ सालापासून त्यांची हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. त्यांनी साकारलेली गणेशमूर्ती परिसरातील युनिक गणेश म्हणून ओळखली जाते. यावर्षी तांबट यांनी चक्क ‘गुड मॉर्निंग’ संकल्पना निवडून गणराय साकारले आहे. सकाळी उठल्यावर सर्वसामान्य नागरिकाला ज्या-ज्या वस्तूंची गरज भासते त्या सर्व वस्तूंचा मोठ्या क ल्पकतेने आणि बुध्दीचातूर्याने वापर करत गुड मॉर्निंग गणेशमूर्ती साकारली आहे. यामध्ये झाडूपासून साबणापर्यंत आणि पैशापासून सिलिंडरपर्यंत अशा वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तांबट यांचा गणरायाचर उंदीरही अत्यंत लक्षवेधी आहे. टोस्ट ला वरच्याबाजूने दोन प्लॅस्टिकचे चमचे लाऊन कपबशी आणि चहाची गाळणीचा वापर करत गणरायाचे वाहन उंदीर त्यांनी साकारले आहे. त्यांनी बेसिनला लागणारा पाईप कौशल्यपुर्वक वापरत गरायची सोंड बनविली आहे. ही गणेशमुर्ती साकारताना त्यांनी काही प्लॅस्टिकच्या बरण्याही वापरल्या आहेत या बरण्यांमध्ये तांदूळापासून तर डाळी त्यांनी भरल्या आहेत.गेल्या वर्षी तांबट यांनी कुंभमेळा संकल्पना घेऊन कुंभगणेश साकारला होता. त्यावेळी लहान मोठ्या माठांचा वापर त्यांनी खुबीने केला होता. १९८३ साली भारताने तत्कालीन कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वाखाली प्रथमच विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे तांबट यांनी त्यावर्षी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टम्प्स्पासून तर चेंडूपर्यंत अशा सर्व साहित्यांचा वापर करत गणराय साकारले होते. तांबट म्हणतात की गणराय ही अश्?ाी देवता आहे, जी प्रत्येक वस्तूमध्ये दिसू शकते.