शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

सर्व कारागृहात लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:30 IST

नाशिकरोड : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली.कारागृह विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी काही दिवसांपूर्वीच रूजू झालेले विठ्ठल जाधव हे मुंबईच्या भायखळा कारागृहात झालेल्या महिला कैद्यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कारागृहांना भेटी देऊन आढावा घेत आहे. शुक्रवारी दुपारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला भेट दिल्यावर पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले की, ब्रिटिश काळापासून असलेल्या पद्धतीनुसारच कारागृह विभागाचे काम सुरू आहे. उस्मानाबाद वगळता राज्यातील सर्व कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कैदी आहे. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कामात काही अडचणी निर्माण होत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. कर्मचारी भरतीबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे जाधव यांनी सांगितले.न्यायालयीन कामकाजासाठी कैद्याला कारागृहातून न्यायालयात ने-आण करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच काही वेळा गैरप्रकारदेखील घडतो. यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल असे जाधव यांनी स्पष्ट केले.  कारागृहाच्या एका कर्मचाऱ्यांने केलेल्या १३ तक्रारीबाबत चौकशी सुरू आहे. तसेच कारागृहात होणाऱ्या मोबाईल वापराबाबत जामर बसविण्याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी जाधव यांनी कारागृह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. काम करताना येणाऱ्या अडचणी, समस्या याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कारागृहातील साने गुरूजी कक्षास जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.