शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडच्या शेळके परिवाराला विठूरायाच्या वारीचा ‘ध्यास’!

By admin | Updated: July 4, 2017 23:43 IST

मनमाड : विठ्ठलाच्या भेटीची आस भोळ्याभाबड्या वारकरी भक्तांना थेट पंढरपूरकडे आकर्षित करत असते.

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : विठ्ठलाच्या भेटीची आस भोळ्याभाबड्या वारकरी भक्तांना थेट पंढरपूरकडे आकर्षित करत असते. वर्षभरातून एकदा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे वारकरी अनेक असले, तरी मनमाड येथील शेळके दांपत्य मात्र महिन्याच्या प्रत्येक एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या पायी लीन होत असतात. त्यांच्या या भक्तिभावाला वंदन करण्यासाठी येथील नीलमणी गणेश मंदिर त्रस्टच्या वतीने त्यांच्या २१७ व्या वारीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायाचे आद्यदैवत पंढरपूरचे श्री विठ्ठल-रखुमाई यांची यात्रा भरते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेच्या या वारीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. परंतु दरमहा वारी करणारे मनमाड शहरातील कलावती व सीताराम शेळके दांपत्य हे या वारकरी संप्रदायातील भक्तीने न्हाऊन निघालेले अनोखे वारकरी आहेत.त्यानिमित्ताने येथील श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने शेळके दांपत्याच्या श्रद्धेचा सन्मान करत ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी व प्रमुख विश्वस्त प्रज्ञेश खांदाट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त सचिव नितीन पांडे यांनी प्रास्ताविकात या सातत्यपूर्ण भक्तिमय दिंडीची माहिती सांगितली. चंद्रकात देवरे व शिवसेनेचे तालुका संघटक संतोष बळीद यांच्या हस्ते शेळके दांपत्यास ट्रस्टच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रदान करण्यात आला.यावेळी विश्वस्त गोविंद रसाळ, शेखर पांगुळ, भरत छाबडा, नीळकंठ त्रिभुवन, सुनील सानप, ओम बाविस्कर, दीपक शिंदे, राजेंद्र चंद्रात्रे, संदीप शिनकर, अक्षय सानप, रितीक चव्हाण, राजेंद्र ताथेड, राजाभाऊ कासार, प्रियेश चंद्रात्रे, विजय शेळके आदींसह गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे विश्वस्त नितीन पांडे व किशोर गुजराथी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.