शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्त करण्यात यावे

By admin | Updated: December 21, 2016 23:28 IST

सुनील देवरे : गळीत हंगाम सुरू ठेवण्यास असमर्थ

कळवण : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवण्यास असमर्थ ठरणाऱ्या प्राधिकृत मंडळाने स्वत: राजीनामा द्यावा अन्यथा शासनाने प्राधिकृत मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी वसाका बचाव कृती समितीचे निमंत्रक सुनील देवरे यांनी केली आहे.  बुधवारी (दि.२१) वसाका बचाव कृती समितीच्या वतीने कळवण येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या लोकनियुक्त संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व लूट करून पोबारा केला असल्याचा आरोप देवरे यांनी यावेळी केला. तसेच उर्वरित संचालकांनी अधिकार नसताना सलग तीन गळीत हंगाम वाया घालविले, सतत पाठपुरावा करून कारखाना बरखास्त केला, असेही त्यांनी सांगितले. शासनाने आपल्या पठडीतील प्राधिकृत मंडळ नियुक्त केले. यात जिल्हा बँक प्रतिनिधींचा भरणा असताना जिल्हा बँकेवर विसंबून राहिलेल्या प्राधिकृत मंडळाने अन्य प्रयत्न न करता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याचा कांगावा करून पद्धतशीर कारखाना बंद पाडला आहे. हा सभासदासह ऊस उत्पादक कामगार व संपूर्ण कार्यक्षेत्राचा विश्वासघात असल्याचा आरोप देवरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. वसाका कारखाना सुरू होणे काळाची गरज असून, कार्यक्षेत्राचे अर्थकारण यावर अवलंबून असतांना प्राधिकृत मंडळ स्वत:ची प्रतिष्ठा जपत कारखान्याची पत घालवीत आहे. केंद्र शासनपुरस्कृत साखर उद्योग वित्तीय सहाय्य योजनेतून कारखान्यास १०० कोटींचे बिगर व्याज कर्ज प्रस्ताव सादर करावा ही सतत मागणी असताना हा प्रस्ताव सादरच झाला नसल्याचेही देवरे यांनी निदर्शनास आणून दिले.  धरणे आंदोलनात कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादाजी पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दीपक पगार, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस उदयकुमार अहेर, शेकापचे दादाजी पाटील, कारखान्याचे माजी अध्यक्ष शांताराम तात्या अहेर, आ. कॉ. जे. पी.  गावित यांना आग्रह धरणार   असल्याचे देवरे व पगार यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)