शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा चिंतातुर !

By admin | Updated: June 27, 2014 00:14 IST

वरुणराजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा चिंतातुर !

 

विक्रम देवरे

दरेगावअरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, डाळींबबागांचे संकट व उशिरा झालेल्या खरिपाच्या पेरण्या यासारख्या चक्रव्यूहाने बळीराजा चिंताग्रस्त आहे. तालुक्यातील पूर्व भाग सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. सिंचनाची कोणतीही सोय नसल्यामुळे केवळ निसर्गावर अवलंबून असणारे येथील शेती व शेतीपूरक व्यवसाय दृष्टचक्रात सापडले आहे. जनावरांचा चारा संपुष्टात आला असून, चारा आणायचा कोठून हा प्रश्न आहे. दरेगाव परिसरात डाळींबबागा भरपूर आहेत. मात्र गतवर्षीही अत्यल्प पाणी यावर्षी मान्सूनचे लांबलेले आगमन यामुळे डाळिंबाचे भवितव्य धोक्यात आले असून, पाणीपुरवठ्यासाठी कोणतीही यंत्रणा नसणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी डाळींबबाग तोडून टाकल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी जळालेल्या बागा पाऊस येईल या आशेने छाटणी करून ठेवलेल्या आहेत. या भागात बोटावर मोजण्याइतके शेतकऱ्यांकडे असणाऱ्या शेततळ्यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. काहंी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात डाळींब बहार धरून ठेवलेला आहे. त्यासाठी गेल्या दोन-चार महिन्यांपासून दूरवरून टॅँकरद्वारे पाणी विकत आणणारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले असून, अनेकांना ऐन मध्यावर आलेले पीक धरावे की सोडावे, अशी परिस्थिती आहे. एकतर कांदा बियाण्याची टंचाई आहे. त्यातच थोडेफार बियाणे आहे त्याची रोपे तयार करण्याइतपतसुद्धा पाणी नाही. टमाटा या पिकाची हीच परिस्थिती आहे. पाऊस नसल्याने अद्यापही पेरणीपूर्व मशागती जमिनीच्या झालेल्या नाही. तसेच खरिपासाठी लागणाऱ्या बी-बियाणे खरेदीही थांबली आहे. (वार्ताहर)