शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वडपे ते ठाणे महामार्ग दुरुस्तीसाठी मुदत

By admin | Updated: October 30, 2016 00:01 IST

उच्च न्यायालय : सिटीझन फोरमने दाखल केली होती जनहित याचिका

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महामार्ग प्राधीकरण आणि ठेकेदारांना येत्या सहा आठवड्यांत वडपे ते ठाणेपर्यंतच्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.  नाशिक सिटीझन फोरमच्या वतीने यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सुवर्ण चतुष्कोनाच्या विकासाच्या धोरणामुळे मुंबई-आग्रा महामार्गाचे विस्तारीकरण झाले आणि नाशिक ते मुंबई प्रवास सोपा झाला, परंतु खासगीकरणातून साकारलेल्या या मार्गाची देखभाल दुरुस्ती करण्याबाबत मात्र उदासीनता दिसून येते. वडपे ते ठाणे हा सुमारे ९० किलोमीटरचा पट्टा असून, या मार्गावर खड्डे पडले आहेत. ठेकेदाराने डांबरीकरण करून ते बुजवण्याआधी काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकले होते. तसेच नियमानुसार या मार्गावर स्वच्छतागृह बांधलेले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नाशिक सिटीझन फोरमचे तत्कालीन अध्यक्ष जितुभाई ठक्कर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुनावणी सुरू झाल्यानंतर फोरमने रस्त्याच्या अवस्थेची छायाचित्रे न्यायालयात सादर केली होती. ठेकेदाराला सुमारे साडेचार कोटी रुपये दंडही झाला होता. तसेच नुकत्याच झालेल्या सुनावणीत ठेकेदाराने महामार्गाची सहा आठवड्यांत दुरुस्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ठेकेदाराने तात्पुरते वापरलेले पेव्हर ब्लॉक काढून कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असून, या कामासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. (प्रतिनिधी)