शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांसाठी लसीकरण मोहीम

By admin | Updated: September 22, 2016 00:01 IST

प्रशासनाला जाग : शेतकऱ्यांमध्ये समाधान

ठेंगोडा : ठेंगोडा व परिसरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांसाठी तातडीने लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.परिसरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांना खरुजसदृश् रोगाची लागण झाल्यामुळे कुत्रे पिसाळण्याची तसेच जनावरांना बाधा होण्याची भीती व्यक्त करत याबाबत पशुसंवर्धन विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध (दि. २०) झाले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी उज्ज्वलसिंह पवार यांनी ठेंगोडा गावातील जनावरांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याचे पत्र ग्रामपंचायतीस दिले. या लसीकरणाबाबत ग्रामपंचायतीने गावात दवंडी देऊन शेतकऱ्यांना आपली जनावरे तसेच पाळीव कुत्र्यांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते.या शिबिराचे उद्घाटन सरंपच छायाबाई अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शेवाळे, भिका वाघ, मधुकर व्यवहारे आदिंसह किशोर परदेशी, गोविंद महाले आदिंसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. या शिबिरात पशुधन अधिकारी डॉ. आर. एन. बढे, डॉ. के. बी. जनकवडे, डॉ. पी.बी. पवार, वनोपचारक नीलेश खैरनार, भूषण अहिरे यांच्या पथकाने गावातील गाय, म्हैस, घोडा, कुत्रे, कोंबड्या अशा ८० जनावरांवर वंध्यत्व निवारण, गोचिड निर्मूलन, खरूज लसीकरण आदिंवर औषधोपचार केल्याची माहिती डॉ.बढे यांनी दिली. लसीकरण व उपचार शिबिर सरंपच छायाबाई आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शेवाळे, भिका वाघ, मधुकर व्यवहारे आदिंसह किशोर परदेशी, गोविंद महाले, तुळशिदास शिंदे, भिला परदेशी आदिंसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)