शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

नागरी दिन सप्ताहास प्रारंभ

By admin | Updated: April 25, 2017 01:12 IST

त्र्यंबकेश्वर : नगरविकास सप्ताहास आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ करण्यात आला.

 त्र्यंबकेश्वर : नगरविकास सप्ताहास आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ करण्यात आला. नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या उपक्रमाला प्रारंभ करताना जिल्हाधिकारी यांनी अपुरे कर्मचारी असताना नागरी दिन साजरा करण्यात जिल्ह्यात पहिल्यांदा सुरुवात केली. शासनाचा नगरविकास विभाग अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा, प्रत्येक कामात लोकसहभाग वाढावा हा या सप्ताहाचा उद्देश आहे. त्यामुळे पालिका कौतुकास पात्र आहे, अशा शब्दांत पालिकेचा गौरव करून कार्यक्षम मुख्याधिकारी व नगरसेवकांचे टीमवर्क हेच कारणीभूत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले. यावेळी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्र्यंबक नगरपालिकेने या उपक्र मात लोकांचा सहभाग नोंदविला. आपला कारभार लोकाभिमुख केला याबद्दल त्र्यंबक नगरपालिकेचे कौतुक केले. याबरोबरच स्वच्छतेचे महत्त्व परमेश्वराला किती प्रिय असते याबद्दल माहिती दिली. या औपचारिक कार्यक्रमात धनंजय तुंगार, मुख्याधिकारी आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, प्रत्यक्ष सफाई कामाला सुरुवात करण्यात आली. आठवडाभर चालणाऱ्या या सप्ताहात अनेक सेवाभावी संस्था, पालिकेशी संबंधित बचतगट आदींचा सहभाग राहणार आहे. (वार्ताहर)