नाशिक रोड : प्रजासत्ताक दिनी नाशिक रोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेच्या नामफलक व वार्ता फलकाचे अनावरण नाशिक रोडचे ज्येष्ठ विक्रेते इस्माईल पठाण व सोमनाथ माळवे यांच्या हस्ते करण्यात आले. या फलकाला नाशिक महापालिकेच्या महासभेत नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांनी विषय पत्रिकेत समाविष्ट करुन मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे डॉ. सीमा ताजणे व राजेंद्र ताजणे यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक सुनील मगर, अध्यक्ष महेश कुलथे, उपाध्यक्ष वसंत घोडे, सरचिटणीस भारत माळवे, खजिनदार उत्तम गांगुर्डे, कार्याध्यक्ष उल्हास कुलथे, संघटक हर्षल ठोसर, संजय चव्हाण, सुनील सूर्यवंशी, नितीन सोनार, कैलास म्हस्के, कुंदन वाघ, बाळू घुमरे, मधुकर सोनार, सुनील शिंदे, बाळू गांगुर्डे, रवींद्र सोनवणे, मनोहर खोले, शैलेश शिंदे, दत्ता मिराणी, विजय रोकडे, सागर गडाख, रवी भोसले आदींसह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. (फोटो २७ पेपर)
वृत्तपत्र विक्रेता संस्थेच्या नामफलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST