शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने प्रचाराचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. ...

नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे.

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ हजार १०५ उमेदवार आपले नशीब आजमवीत आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार यंदा उमेदवारांना प्रचाराचा वेळ तसाही कमी मिळणार असल्याने, उमेदवारांनी माघारीच्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती, परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने उमेदवारांच्या मनसुब्यांवरही पाणी फिरले आहे. प्रचाराचे नियाेजन पावसामुळे कोलमडल्यामुळे कमी वेळेत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने, उमेदवारांच्या हाती आता केवळ दोनच दिवस उरले आहेत.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक राजकीय नेते, तसेच स्थानिक पुढाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याने जवळपास दीड हजार प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, तर काही ठिकाणी ऐन वेळी उमेदवाराने अर्ज कायम ठेवल्याने दोन ते चार जागांसाठीच मतदान होत आहे. त्यामुळे या जागांमधील चुरशीची लढत महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकांमध्ये आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे आमदारांनीही लक्ष घातल्याने आगामी दिवसात निवडणुकीतील चुरस अधिक बघायला मिळू शकते.

येत्या १३ सारखेला सायंकाळी प्रचाराची अधिकृत सांगता होणार असून, त्यानंतर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख केली जाणार आहे. मतदानाच्या पूर्वीच्या दोन दिवसांतील घडोमोडीवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा कार्यक्रमही आखण्यात आला आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. १५ तारखेला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे.

--इन्फो--

प्रशासकीय तयारी पूर्णत्वाकडे

प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहे. जिल्ह्यातील एकूण १,९३३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी अंदाजे १० हजार इतके कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील २,१३२ प्रभागामंध्ये ५,८९५ जागांसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यापैकी १,६२७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.