सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे गेल्या पाच दिवसांपासून एक बेवारस कार आढळल्याने ग्रामस्थांमध्ये कुतुहल आणि भिती व्यक्त केली जात आहे.इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्यासमोर बुधवार (दि. १३) पासून मारुती सुझुकी वॅगनआर कार (एम.एच ०३ सी.एच ४२२२) ही टूरिस्ट अँड ट्रॅव्हल कार गेल्या चार दिवसांपासून एकाच जागेवर बेवारस उभी आहे.गेल्या चार दिवसापासून ही बेवारस कार एकाच जागेवर उभी असल्याने टाकेद येथील ग्रामस्थांमध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे.दरम्यान हा कार विषय गावातील ग्रामस्थ यांनी पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड यांना काळविल्यानंतर पोलिस पाटील प्रभाकर गायकवाड यांनी ही बाब घोटी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदार महाले यांना कळविली आहे. सदर बेवारस टूरिस्ट वॅगनआर कारचा पुढील तपास घोटी पोलीस ठाणे करत आहेत.(फोटो १७ टाकेद)
टाकेद येथे बेवारस मारु ती कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 19:44 IST
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद येथे गेल्या पाच दिवसांपासून एक बेवारस कार आढळल्याने ग्रामस्थांमध्ये कुतुहल आणि भिती व्यक्त केली जात आहे.
टाकेद येथे बेवारस मारु ती कार
ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये कुतुहल आणि भिती व्यक्त