नाशिक : नेमून दिलेले काम वेळेत न करणे आणि वरिष्ठांनी सांगूनही कामात हलगर्जीपणा करणे, या कारणांवरून जिल्हा परिषदेच्या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी रहिम मोगल यांनी या कार्यवाहीला दुजोरा दिला आहे.दोन दोन वर्षांपासून संबंधित तिघा कर्मचाऱ्यांच्या कपाटातच आवश्यक त्या माहितीची कागदपत्रे आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ सहायक पी.व्ही निफाडे, जी. पी. थोरात व कनिष्ठ सहायक आर.के. मारू या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या तीनही कर्मचाऱ्यांना कामे जमत नाहीत. कामामध्ये कसूर करणे व वरिष्ठांचे आदेश न जुमानणे या कारणांमुळे या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठांनी प्राथमिक शिक्षण विभागात जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांबाबत असलेल्या तक्रारींची शहानिशा करण्याच्या उद्देशाने तीनही कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या कामकाजाची माहिती घेण्याबरोबरच त्यांच्याकडे नेमके काय प्रलंबित आहे, याची माहिती घेऊन तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे सादर केला. (प्रतिनिधी)
कामात हलगर्जीपणा; तीन कर्मचारी निलंबित
By admin | Updated: June 24, 2015 23:40 IST