शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

मुक्त विद्यापीठाआडून नाशिकवर अन्याय, शिवसेनेचा आरोप

By admin | Updated: July 14, 2016 01:01 IST

मुक्त विद्यापीठाआडून नाशिकवर अन्याय, शिवसेनेचा आरोप

 नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे २२० पैकी १४५ अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने बंद केले असून केंद्र सरकार आता विद्यापीठाआडून नाशिकवर अन्याय करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यासंदर्भात पक्षाने कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना निवेदन देऊन जाब विचारला असून या गोंधळास जबाबदार कोण याचा खुलासा मागितला आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे वंचितांच्या शिक्षणासाठी स्थापन झालेले आहे. ज्ञानगंगा घरोघरी हे त्यांचे ब्रीद आहे; मात्र आता उलटी ज्ञानगंगा वाहत आहे. विद्यापीठाचे अभ्यासक्रम केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाने नाकारले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. अभ्यासक्रम राबविण्यात चुका असतील तर आयोगाने विद्यापीठावर कारवाई करावी, अभ्यासक्रम नाकारून विद्यार्थ्यांना दंडीत करण्याचे कारण काय, असा प्रश्न शिवसेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी हे एकीकडे स्किल इंडियाचा नारा देतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील एका चांगल्या विद्यापीठाची अडवणूक सुरू असून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, युवासेनेच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना निवेदन देण्यात आले असून त्यात विद्यापीठाच्या नाकारलेल्या अभ्यासक्रमांच्या गोंधळास जबाबदार कोण याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आदित्य बोरस्ते, गणेश बर्वे, प्रशांत काळे, विशाल खैरनार, अमित पाटील यांनी केली आहे.