झालेल्या कामावर खड्डे खोदताना असलेली माती व्यवस्थित रोडरोलरने दाबून घेणे अपेक्षित असताना फक्त माती दगडधोंडे टाकून बुजून टाकण्यात आली. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून, नागरिकांना रस्त्याने जाणे-येणे अवघड झाले आहे. जे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच होणे अपेक्षित होते ते म.न.पा च्या चुकीच्या नियोजनामुळे रखडले आहे. जागोजागी रस्त्यावर पाणी साचून खड्डा कुठे आणि रस्ता कुठे, हे समजणे अवघड झाले आहे. दुचाकीस्वार यात घसरून पडत असल्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
लाखो रुपये खर्च असलेले हे काम इतक्या संथ गतीने का, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. मनुष्यबळ, जे.सी.बीची संख्या वाढवून जलद गतीने काम करून घेणे गरजेचे आहे. डी. के स्टॉपची परिस्थिती तर अतिशय भयानक झाली आहे. तेथे जागोजागी खड्डे, चिखल, वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात आहे. नागरिक महानगरपालिकेच्या व लोकप्रतिनिधींच्या नावाने खडे फोडताना दिसत आहेत. सोयगावात छत्रपती शिवाजी महाराज तालमीच्या नूतन इमारतीचे काम चालू असून, त्याच्या दर्जाबाबत गावातील तरुणांकडून तक्रार केली जात आहे.