शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळे; आजपासून कारवाई

By admin | Updated: November 8, 2016 00:51 IST

महापालिकेचे नियोजन : सिडकोतून मोहिमेस होणार प्रारंभ

नाशिक : उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई मंगळवार (दि.८) पासून होत असून, त्याची सुरुवात सिडकोपासून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांवर अडथळा ठरणारी ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.न्यायालयाच्या निर्देशानुसार महापाालिकेला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई पूर्ण करावयाची आहे. २९ सप्टेंबर २००९ नंतरची शहरात सार्वजनिक जागेत २४५ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. त्यातील २१४ महापालिकेच्या जागांवर, तर ३१ स्थळे सिडकोच्या जागेत आहेत. न्यायालय आणि राज्य शासनामार्फत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे वारंवार निर्देश दिले जात असल्याने महापालिकेने त्याबाबतचे नियोजन आता पूर्ण केले आहे. सोमवारी पोलीस आयुक्तालय, सिडको आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बैठक घेतली आणि कारवाईच्या नियोजनाचा आढावा घेत कालबद्ध कार्यक्रमाची आखणी केली. नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात रस्त्यात अडथळा ठरणारी ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात मंगळवार (दि.८) पासून सिडको विभागातून करण्यात येणार आहे. सिडकोतील चार अनधिकृत धार्मिक स्थळांचा समावेश आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई करण्यासाठी पोलिसांकडेही बंदोबस्त मागवण्यात आला आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी दिलेल्या मुदतीत कारवाई न केल्यास महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात न्यायालयाचा कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाईची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)२२३ धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव२९ सप्टेंबर २००९ पूर्वीची ६६९ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. मात्र, त्यासाठी तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात नियमितीकरण करायचे आहे, तर दुसऱ्या टप्प्यात जे नियमित होऊ शकत नाहीत त्यांना हटवायचे आहे. जे नियमित होऊ शकत नाही, परंतु संबंधितांनी ते खासगी जागेत स्थलांतरित करण्याचे ठरविल्यास त्यांना परवानगी दिली जाणार आहे. ६६९ पैकी २२३ धार्मिक स्थळे ही १९६० पूर्वीची आहेत. या धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. पाडण्यात येणाऱ्या ४२६ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी दोन-तीन दिवसांत प्रसिद्ध केली जाणार असून, अद्याप एकही प्रस्ताव स्थलांतरणासाठी आला नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.