शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या ५७ अभ्यासक्रमांना यूजीसीचा ब्रेक

By admin | Updated: July 14, 2016 00:51 IST

कुलगुुरूंचे मौन : हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाऱ्यावर

नाशिक : समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध अभ्यासक्र्रम सुरू करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या तब्बल ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी कुलगुरूंनीच मौन साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम चालविले जातात. त्यातील निम्म्याहून अधिक अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारित आहेत. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देता यावे, या हेतूने विद्यापीठाने हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत; मात्र यातील ५७ अभ्यासक्रमांची यूजीसीने मान्यता रद्द केल्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे रद्द केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांचाच अधिक समावेश असल्याने ‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डीएमएलटी, बीएससीआयडी, बी. ए. डिझायनिंग अशा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे. शिवाय या अभ्यासक्रमांचे प्रवेश शुल्कदेखील हजारो रुपये असल्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.