शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:55 IST

नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला

नाशिक : नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, संबंधित संस्थांनी आपल्याकडील संस्थांनी टाइपिंग बंद करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, अनेक टाइपरायटर संघटनांनी अभ्यासक्रम बंद न करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक लाभ होणार आहे.राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर तसेच शासनाच्या सर्व विभागांमध्ये ई-गर्व्हर्नन्स, ई-आॅफिस पद्धत अवलंबिण्याचे शासनाने धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे २०१३ मध्ये संगणक टंकलेखनाची संकल्पना प्राधान्याने समोर आल्यामुळे मॅन्युअल टाइपरायटरच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला. मात्र हा अभ्यासक्रम एकदम बंद न करता २०१५ पर्यंत टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि त्यानंतरही शुद्धीपत्रक काढून मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दि. १३ जुलै २०१६ ला पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास ३१ मे २०१७ मध्ये मुदतवाढ देण्यात आली.दि. १६ नोव्हेंबर च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शाासनमान्य लघुलेखन टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबत दि. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली. मात्र त्यानंतर सदर अभ्यासक्रम बंद करू नये यासाठी सातत्याने काही संघटनांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार शासनमान्य लघुलेखन टंकलेखन संस्थांमध्ये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली. पुढील कालावधीचा उल्लेख शासनाने दिला नसला तरी निदान आणखी काही वर्षे तरी टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार चित्र आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभशहरी भागातील काही टाइपरायटर इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही मॅन्युअल टाइपिंग शिकविले जाते. तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे. वाढीव मुदतीमुळे सर्वांचीच सोय होणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक लाभ होईल. विजेचा प्रश्न असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्यॅन्युअल टाइपरायटिंग महत्त्वाचा पर्याय ठरतो.- सचिन जाधव, संचालक, अशोक कॉम्प्युटर अ‍ॅण्ड टायपरिंग.जेलरोड. नाशिकरोड.

टॅग्स :typewriterटाइपरायटरEducation Sectorशिक्षण क्षेत्र