शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

टाइपरायटरची टक टक शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:06 IST

नाशिक : इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून, जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाइपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकीय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परीक्षा संगणकावरूनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टाइपरायटरच्या ‘टक-टक’ला पूर्णविराम मिळाला.

नाशिक : इंटरनेटच्या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांनी मोठी क्रांती घडवून आणली असून, जग जवळ आले आहे. यामुळे काळानुरूप ‘टाइपरायटर’ इतिहासजमा झाले. कारण शासकीय स्तरावर परिषदेच्या वतीने आता टंकलेखन परीक्षा संगणकावरूनच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टाइपरायटरच्या ‘टक-टक’ला पूर्णविराम मिळाला.राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये लिपिक, टंकलेखक पदावरील नियुक्तीसाठी राज्य परीक्षा परिषदेची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. टाइपरायटर कालबाह्य होणे साहजिकच होते. त्यामुळे शिक्षण विभागानेही आता यापुढे टंकलेखनाची परीक्षा संगणकावर घेतल्या जाऊन आधुनिक युगाबरोबर चालण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला आहे. २०१३सालीच शासनाने टंकलेखनाची परीक्षा संगणकामार्फत घेण्याचा विचार केला होता; मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल चार वर्षे लोटली.चालू वर्षापासून मात्र टंकलेखनाची परीक्षा संगणकावरून कायमस्वरूपी घेतली जाणार आहे. १८ आॅगस्टपासून टंकलेखनाच्या संगणकीकृत परीक्षेला प्रारंभ होत आहे. टाइपरायटरवरील अखेरची परीक्षा ७ आॅगस्टपासून सुरू होती. त्याचा शेवट शनिवारी झाला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधील टंकलेखनाच्या संगणकावरील अभ्यासक्रमामध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. टंकलेखनाची वेगमर्यादाही तेवढीच ठेवण्यात आली आहे.टाइपरायटर यंत्र बनणार संग्रहएकूणच संगणकाचे प्रस्थ पूर्णपणे निर्माण होईपर्यंत आपले अस्तित्व टिकविणाºया टाइपरायटरची आता मात्र ‘एक्झिट’ झाल्याने टायपिंग इन्स्टिट्यूटमध्येही टंकलेखनाचे धडे संगणकावरच दिले जाणार आहेत. त्यामुळे संगणकीकृत टायपिंग इन्स्टिट्यूट असे नामकरण होण्याची यापुढे शक्यता आहे. काळानुरूप या बदलाचा स्वीकार करणे स्वाभाविक आहे. त्यामुळे बहुतांश इन्स्टिट्यूटमध्येही टाइपरायटर यंत्र हे एक संग्रही म्हणून बघावयास मिळणार आहे.