शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणात दोघे तरूण बुडाले; एकाचा मृत्यू

By admin | Updated: April 19, 2017 20:46 IST

येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरूण संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरूण संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, तासाभराने एका तरूणाचा मृतदेह पोलिसांना जलाशयामधून काढण्यास यश आले तर दुसऱ्या तरूणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य नाशिक अग्निशमन विभागाचे जवान व पोलीस युध्दपातळीवर करीत आहेत.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोवर्धन शिवारात असलेल्या एका वाईन फॅक्टरीमध्ये डेकोरेशन करण्यासाठी आठ ते दहा तरुण शहरातील विविध भागांमधून आले होते. काम आटोपल्यानंतर संध्याकाळी गंगापूर धरणावरील रम्य वातावरण व सुर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी हे सर्व मित्र जवळच्या सावरखेड गावालगत असलेल्या बॅक वॉटरवर पोहचले. यावेळी इश्तियाक शेख (१९,रा. लेखानगर), अभिनव सेन (२०, रा इंदिरानगर) यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही व हे दोघे पाण्यात उतरले. दरम्यान, पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी दोघेही पाण्यात बुडाल्याचे बघून त्यांच्या मित्रांनी पोलीस मुख्यालयासह, अग्निशमन मुख्यालयाला सदर बाब तातडीने भ्रमणध्वनीवरून कळविली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव अग्निशमन मुख्यालयाचा एक बंब व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे गस्त पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पोलीस प्रथम घटनास्थळी पोहचले व शोधकार्याला सावरगाव ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांच्या मदतीने प्रारंभ केला आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून जॅकवेलच्याजवळ असलेल्या डोहाजवळून शेख याचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना यश आले; मात्र सध्या बेपत्ता सेनचा शोध अग्निशमन विभागाचे जवान व ग्रामरक्षक दलाचे कार्यकर्ते घेत आहे. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.