शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे!

By admin | Updated: June 25, 2014 00:13 IST

दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे!

 

आनंद बोरा

नाशिकत्र्यंबक तालुक्यातील हरसूलजवळच्या ठाणापाडा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी भारतीय गिधाड व पांढऱ्या पाठीचे गिधाड या दोन जातींची तब्बल चाळीस गिधाडे एकाच वेळी आढळून आली. नेचर क्लबच्या वतीने गिधाडांच्या संवर्धनासाठी त्यांची जिल्ह्यातील संख्या, त्यांच्या वसाहती शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शोधमोहिमेत ठाणापाड्याजवळच्या खैराई किल्ल्याच्या समोर सदर गिधाडे दृष्टीस पडली. तेथील दोन मृत जनावरे खाण्यासाठी ती आली होती. एकाच जनावरावर तुटून पडलेली दोन जातींची गिधाडे दिसणे ही दुर्मीळ घटना आहे. जनावरे खाण्यासाठी या दोन जातींमध्ये संघर्षदेखील बघावयास मिळत होता. गिधाडांना आता खाद्यच उपलब्ध होत नाही. वन विभागाच्या गिधाडे संवर्धन योजनेचा मोठा गाजावाजा झाला. आणखी दोन ‘रेस्टॉरंट’ला परवानगीदेखील मिळाली; पण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होत नसल्याने ही योजना अपयशी होताना दिसत आहे. जिल्ह्यात गिधाडांची संख्या बऱ्यापैकी वाढत असून, त्यांच्या संवर्धनासाठी योग्य पावले उचलण्याची वेळ आली आहे. जंगलातला हा फुकटचा सफाई कामगार वाचला तर आपण वाचणार आहोत, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.