शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या तिघांना अटक दोन संशयित आरोपी फरार

By admin | Updated: May 18, 2014 23:48 IST

नगरसूल : येवला- मनमाड रोडवर कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी फरार झाले.

नगरसूल : येवला- मनमाड रोडवर कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी फरार झाले.येवला- मनमाड महामार्गावरील आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील सावेर येथील ट्रकचालक रस्त्याच्या कडेला आपला ट्रक उभा करून खाली उतरला असता, पाच जणांच्या टोळक्यांनी त्यास चॉपरचा धाक दाखवून वीस हजार रुपये हिसकावून घेतले. वेळीच ट्रकचालकाने आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. तालुका पोलिसांना तत्काळ घटनेची माहिती कळविण्यात आली. योगायोगाने त्याच सुमारास गस्ती पथकावर असणार्‍या पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चोरट्यांचा पाठलाग केला असता. तीन आरोपींना पकडण्यात आले, तर दोन आरोपी पसार झाले. ट्रकचालक शेराली दाऊद शेख रा. सावेर, इंदूर (मध्य प्रदेश) याने तालुका पोलिसांत फिर्याद दिल्याने, भगवान दिलीप परदेशी, रा. येवला, संतोष गौतम खरात, दीपक कनीराम पठारे, रा. कोपरगाव यांना अटक करण्यात आली, तर अमोल लक्ष्मण वारे (रा. कोपरगाव) व राहुल राजपूत (रा. शिर्डी) या फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राम भालसिंग, पोलीस हवालदार वनवे, पोलीस उपनिरीक्षक भरत राजपूत, कांबळे, शेख आदि करत आहे. दरम्यान, वारंवार घडणार्‍या रस्ता लुटीमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांना आजच्या तालुका पोलिसांच्या दक्षतेमुळे दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (वार्ताहर)---