शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राममध्ये दोन पिठाच्या गिरण्या

By admin | Updated: August 14, 2015 00:19 IST

मेडिकल स्टोअर्स गायब : पालिकेमार्फत १११ स्टॉल्सचा लिलाव

नाशिक : तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये महापालिकेने विविध व्यावसायिकांसाठी उभारलेल्या १३१ स्टॉल्सपैकी १११ स्टॉल्सचा लिलाव झाला असून, त्या माध्यमातून ४२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, यामध्ये केवळ दोघाच व्यावसायिकांनी पीठ गिरणी थाटण्यास तयारी दर्शविली, तर अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीमुळे मेडिकल स्टोअर्स उभारण्यास अडचणी उत्पन्न झाल्या आहेत. महापालिकेने साधुग्राममध्ये दाखल झालेल्या साधू-महंतांना भाजीपाल्यापासून किराणा माल, कपडे यांपर्यंत विविध वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता सेक्टरनिहाय १३१ स्टॉल्स उभारले आहेत. या स्टॉल्ससाठी दोन टप्प्यांत लिलावप्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात ९४ स्टॉल्सचा लिलाव झाला, तर दुसऱ्या टप्प्यात १७ स्टॉल्सला व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळाला. अजूनही २० स्टॉल्स शिल्लक असून, लवकरच त्यासंबंधीही लिलावप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. सदर स्टॉल्समध्ये पिठाच्या गिरण्यांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. साधूंना गहू दळण्यासाठी शहरातच धाव घ्यावी लागणार असल्याने साधुग्राममध्येच पिठाची गिरणीही उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. आतापर्यंत केवळ दोनच व्यावसायिकांनी पिठाची गिरणी लावण्याची तयारी दाखविली असली तरी, त्यांना परवानग्या स्वत:च घ्यायच्या आहेत. याशिवाय साधुग्राममध्ये मेडिकल स्टोअर्सही उभारण्याचे नियोजन होते; परंतु नियमावलीनुसार कुठेही मेडिकल स्टोअर्स थाटता येत नसल्याने तो प्रस्तावही बारगळला आहे. (प्रतिनिधी)