शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

घोटी-सिन्नर महामार्गावर अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना तात्काळ एसएमबीटी रुग्णालयात हलविण्यात आले. ...

अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना तात्काळ एसएमबीटी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अल्टो कार (क्र एमएच १५ / एफएन २१९९) ही घोटीहून सिन्नरच्या दिशेने जात असताना तसेच मोबिलिओ कार (क्र. एमएच ०४/एआर २११३) ही घोटीच्या दिशेने येत असताना बेलगाव तऱ्हाळे शिवारात त्यांचा समोरासमोर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अल्टो कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात अल्टो कारमधील सुनील विठोबा गाडेकर (वय ३६, रा ठाणगाव सिन्नर) तसेच तनिष्क संपत जाधव (१२, रा. घोटी) या दोघांचा मृत्यू झाला, तर कारचालक संपत रामकृष्ण जाधव (रा. घोटी) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुसऱ्या मोबिलिओ कारमधील कल्याण येथील पाचजण जखमी असून त्यांना जवळच्या एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अपघाताचे वृत्त समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुहास गोसावी, बस्ते, भोये आदींनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो- २० घोटी ॲक्सिडेंट

200821\20nsk_15_20082021_13.jpg

फोटो- २० घोटी ॲक्सीडेंट