शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावात दोन अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले

By admin | Updated: February 17, 2017 00:35 IST

फुले झोपडपट्टीतील घटना : कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाइल

 नाशिक : अपक्ष उमेदवाराची प्रचारसभेत दुसऱ्या अपक्ष उमेदवाराची प्रचारफेरी आल्यानंतर दोघांमध्ये आरोप - प्रत्यारोप होऊन कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाइल झाल्याची घटना गुरुवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ या हाणामारीदरम्यान पोलीस वेळेवर पोहोचल्याने पुढील मोठा अनर्थ टळला़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक ३० मध्ये दोन अपक्ष उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ रात्रीच्या वेळी एका उमेदवाराची प्रचारसभा, तर दुसऱ्याची प्रचारफेरी सुरू होती़ या उमेदवारांचे कार्यकर्ते सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत समोरासमोर आले व त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले़ यानंतर अचानक दोन्ही उमेदवारांचे समर्थक एकमेकांशी भिडले़ मात्र, या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली़दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी मोठा जमाव जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता़ या घटनेमुळे वडाळागावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़