शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दोघा आजी-माजी नगरसेवकांना फटका

By admin | Updated: February 6, 2017 00:17 IST

सिडको विभाग : एबी फॉर्म गोंधळ; अपक्ष म्हणून लढावे लागणार

सिडको : प्रभाग क्रमांक २८ व २९ मध्ये शिवसेनेच्या वतीने आठ जागांसाठी सुमारे १५ एबी फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ झाला होता. ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अगोदर सादर केला आहे, त्या उमेदवारांना शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे या प्रभागांतून दोघा विद्यमान नगरसेवकांसह दोघा माजी नगरसेवकांना आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे.  प्रभाग क्रमांक २८ मध्ये तिघे विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, शीतल संजय भामरे, सुवर्णा दीपक मटाले व युवासेनेचे पदाधिकारी दीपक दातीर यांनी पक्षाचे एबी फॉर्म दिले होते, तर याच प्रभागातून विद्यमान नगरसेवक माणिक सोनवणे, रेणुका शरद गायधनी, सोनाली अजित काकडे यांनादेखील एबी फॉर्म दिले होते. तसेच प्रभाग क्रमांक २९ मध्ये विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके, रत्नमाला राणे, माजी नगरसेवक सुमन वामन सोनवणे, सतीश खैरनार यांना पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिले होते, तर याच प्रभागातून विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर,अतुल डेअरीचे संचालक भूषण देवरे, सुमन सोनवणे व माधुरी खैरनार यांनीही पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म लावून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याबाबत प्रभाग २८ मधून डी. जी. सूर्यवंशी, शीतल संजय भामरे, सुवर्णा दीपक मटाले व दीपक दातीर हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जाधव यांनी घोषित केले, तर रविवारी प्रभाग २९ चा निकाल देण्यात आला. यात दीपक बडगुजर, भूषण देवरे, रत्नमाला राणे, सुमन सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. करे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. यामुळे मनसेतून सेनेत गेलेले नगरसेवक अरविंद शेळके, सेनेचे स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे तसेच सतीश खैरनार व माधुरी खैरनार या माजी नगरसेवकांना आता अपक्ष उमेदवारी करावी लागणार आहे. (वार्ताहर)