शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वादळात सोळा घरकुले नेस्तनाबूत

By admin | Updated: May 12, 2017 00:50 IST

सटाणा : नियम धाब्यावर बसवून लाखो रुपये खर्चाचा घरकुल घोटाळा निसर्गानेच चव्हाट्यावर आणल्याचा प्रकार लखमापूर येथे उघडकीस आला आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : नियम धाब्यावर बसवून लाखो रुपये खर्चाचा घरकुल घोटाळा निसर्गानेच चव्हाट्यावर आणल्याचा प्रकार बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने काही क्षणात सदोष बांधकाम असलेली तब्बल सोळा घरकुले नेस्तनाबूत करून टाकली. त्यामुळे आदिवासी कुटुंबे बेघर होऊन त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. एवढी मोठी दुर्घटना होऊनही शासकीय यंत्रणा फिरकली नसल्याने आदिवासींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, शासनाने बेघर झालेल्या आदिवासींचे पुनर्वसन करण्याबरोबरच सदोष बांधकाम केलेल्या बत्तीस लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ मध्ये लखमापूर गावच्या २०५ लाभार्थींसाठी घरकुले मंजूर करण्यात आली होती. पैकी ३२ लाभार्थींकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे ती रखडली होती. आदिवासी बांधव वंचित राहू नयेत म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने पंचायतच्या मालकीच्या भूखंडावर घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही योजना ठेकेदारामार्फत राबविण्यात येईल, अशी अट ग्रामपंचायत प्रशासनाने टाकली. त्यानुसार सुमारे बत्तीस लाख रुपये खर्चाची योजना ठेकेदारामार्फत करण्याच्या निर्णयाला लाभार्थींनी संमती दिली. त्यानुसार हे काम एका खासगी ठेकेदाराला देण्यात आले. काही महिन्यांपूर्वी ही योजना पूर्ण करून लाभार्थींना नुकतेच घरकुलांचे वाटप करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वी जोरदार वादळ आले आणि तब्बल सोळा घरकुले अक्षरश: नेस्तनाबूत झाली. सुदैवाने सर्वच कुटुंबे मजुरीसाठी बाहेर गेल्याने जीवितहानी टळली.