शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नऊशे विद्यार्थ्यांना हव्यात उत्तरपत्रिका

By admin | Updated: June 26, 2014 01:04 IST

नऊशे विद्यार्थ्यांना हव्यात उत्तरपत्रिका

 

नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर विभागातील ८८९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्सची मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना झेरॉक्स देण्याचे काम मंडळात सध्या युद्धपातळीवर सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे ४७५ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची झेरॉक्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्राप्त झाल्यानंतर पाच दिवसांत काही शंका असल्यास विद्यार्र्थी मंडळाकडे तक्रार करू शकतात. दरम्यान, आत्तापर्यंत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे समजते. गेल्या फेब्रुवारी/मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी विभागातील ७५१ महाविद्यालयांतून एक लाख ३३ हजार १४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी एक लाख ३२ हजार ९६१ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख १७ हजार ९४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाच्या निकालाची एकूण टक्केवारी ८८.७१ इतकी आहे. बारावीत जे विद्यार्थी थोडक्यात अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांना आपणाला कमी गुण मिळाले किंवा गुण देताना काही त्रुटी असण्याची शक्यता वाटते, असे विद्यार्थी उत्तरपत्रिका मिळविण्यासाठी अर्ज करतात. त्यानुसार विभागातील सुमारे ८८९ विद्यार्थ्यांनी मंडळाकडे अर्ज सादर करून उत्तरपत्रिका झेरॉक्सची मागणी नोंदविली होती. २१ जून ही मागणी नोंदविण्याची अखेरची तारीख होती. तत्पूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची झेरॉक्स दिली जात आहे. झेरॉक्सप्रत मिळाल्यानंतर विद्यार्थी आपल्या विषय शिक्षकामार्फत उत्तरपत्रिकेची तपासणी करून कशा पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्यात आली, याची खात्री करून घेऊ शकतात. जर विद्यार्थ्यांना काही शंका आल्यास किंवा गुणात फरक पडत असेल किंवा काही प्रश्नांना गुण देण्याचेच राहून गेले असेल तर असे प्रकार मंडळाच्या निदर्शनास आणून दिले जाऊ शकतात. मागीलवर्षी म्हणजेच मार्च २०१३ मध्ये नाशिक विभागातून एक लाख ४७ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ११७ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाकडे अर्ज सादर केले होते. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुन्हा मूल्यांकन केल्यानंतर ९८ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरफार झाल्याचे दिसून आले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांच्या एकूण टक्केवारीत वाढ झाली, तर काही अनुत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णही झाले आहेत. राज्यभरात अशा सुविधेचा लाभ घेतल्यामुळे ९३० विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. राज्याचा विचारा करावयाचा झाल्यास १५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ९३० विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाला. (प्रतिनिधी)