शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक गावठाणात चोवीस तास पाण्याचा प्रोजेक्ट गुंडाळला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST

नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्यावतीने एरिया बेस्ड डेव्हलपमेंट म्हणजेच एबीडी अंतर्गत रस्ते पाणी आणि मलवाहीकांची कामे सुरू असली तरी ...

नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्यावतीने एरिया बेस्ड डेव्हलपमेंट म्हणजेच एबीडी अंतर्गत रस्ते पाणी आणि मलवाहीकांची कामे सुरू असली तरी सर्वात महत्त्वाचा भाग हा चोवीस तास मुबलक पाणी पुरवठ्याचा आहे. नाशिक आणि पंचवटी गावठाण भागात चोवीस तास पाणी पुरवठ्याचे नियोजन असून, त्यासाठी बारा बंगला आणि पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रात नूतनीकरण तसेच सम्प (जमिनीखालील टाकी) एमबीआर (जलकुंभ) आणि अन्य कामे करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात गावठाण भागात जलवाहिन्या तसेच जलकुंभ आणि अन्य कामे करायची होती. यातील दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत; परंतु जे मूलभूत कामे जलशुद्धीकरण केंद्रात करायची आहेत, त्याच्या निधीवरून वाद आहेत.

२०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे असताना स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या योजनेची माहिती दिली हेाती. त्यानंतर कंपनीने बारा बंगला आणि पंचवटी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. त्या ज्यादा दराच्या आल्यानंतर काही तांत्रिक बाबी पुढे आल्या. त्यानंतर कंपनीने या दोन्ही कामांसाठी निविदा मागवणे बंद करून उर्वरित कामांच्या निविदा मागवल्या, त्यानुसार कामे सुरू आहेेत. त्यानंतर पंचवटी जलशुद्धीकरणाची कामे होत नसल्याचे बघितल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निधीतून कामे करण्याची गळ घातली आणि प्रशासनाने त्यानुसार निविदा मागवल्या. सहा टक्के कमी दराच्या निविदा आल्यानंतर आता हे काम महापालिकाच करणार आहे; परंतु बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रासाठी निधी नसल्याने त्यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीकडे निधीसाठी कोणतीही तरतूद नाही, असे स्पष्ट करणारे पत्र कंपनीने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला पाठवले असून, त्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. सध्या कंपनीने नाशिक गावठाण भागात जलवाहिनी आणि अन्य कामे केली तरी मुळातच जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढ आणि अन्य कामांसाठी निधीच नसल्याने बारा बंगला येथील कामे हेाणार नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे हा नाशिक गावठाण म्हणजेच जुने नाशिकचा भाग हा चोवीस तास पाणी पुरवठ्यापासून वंचित राहणार, असे दिसते आहे.

इन्फो...

कंपनी म्हणते हे काम नव्हतेच

स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाण भागात जल वितरण सुविधा देण्याचे काम देण्यात आले असले तरी मुळातच बारा बंगला आणि पंचवटी येथे जलशुद्धीकरण केंद्रात क्षमता वृद्धीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी नव्हता. मुळात स्मार्ट सिटीच्या मूळ प्रेाजेक्टमध्ये ही कामेच नव्हती; परंतु तरीही ती करण्याची तयारी कंपनीने दर्शवली होती; मात्र निविदा काढल्यानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अनेक कामे ही स्मार्ट सिटी कंपनीच्या अखत्यारीत (स्कोपमध्ये) नाहीत, असे सांगितले. त्यामुळे कंपनीच्या स्कोपमध्ये काय येते, याबाबत अनेकदा विचारणा करूनदेखील प्रतिसाद मिळालेला नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.

इन्फो..

गावठाण भागात चोवीस तास पाणी देण्यासाठी बारा बंगला आणि जलशुद्धीकरण येथे क्षमता वाढ तसेच अन्य कामे करण्यासाठी ४० कोटी १७ लाख ४१ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे तर गावठाण भागात जलकुंभ आणि जलवाहिन्यांची कामे करण्यासाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्मार्ट सिटी कंपनी आता ७० कोटी रुपयांची कामे करीत असली तरी उर्वरित ४० कोटी रुपये मंजूर असूनही हा निधी गेला कुठे, असा महापालिकेचा सवाल आहे.