शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला अडचणीत आणण्याचा डाव

By admin | Updated: March 10, 2017 02:10 IST

महापालिकेत विरोधकांनी आता भाजपाला स्थायी समितीत अडचणीत आणण्याचे डावपेच आखणे सुरू केले आहे.

नाशिक : महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळल्याने त्यांचाच महापौर-उपमहापौर विराजमान होणार, हे निश्चित असल्याने विरोधकांनी आता भाजपाला स्थायी समितीत अडचणीत आणण्याचे डावपेच आखणे सुरू केले असून, आघाडी करण्याच्या हालचाली होत आहेत. मात्र, कोटापद्धतीनुसार भाजपाचे ९ सदस्य स्थायीवर जाणार असल्याने भाजपाचाच सभापती होणार असल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे. महापालिकेत भाजपाचे ६६ सदस्य आहेत, तर शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३, रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने भाजपाचा महापौर-उपमहापौर बसणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आता स्थायी समितीकडे आपले लक्ष केंद्रित केले असून, स्थायीवर कशाप्रकारे कब्जा करता येईल, यादृष्टीने आकडेमोड करत हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थायी समितीवर १६ सदस्य नियुक्त करायचे आहेत. राजकीय पक्षांच्या महापालिकेतील संख्याबळानुसार कोटा ठरविला जातो, त्यानुसार सदस्यांची नियुक्ती केली जात असते. स्थायी समितीवर प्रतिसदस्य ७.६२ चा कोटा निश्चित आहे. त्यानुसार, भाजपाच्या ६६ संख्याबळानुसार ८.६५ म्हणजे ९ सदस्य स्थायीवर नियुक्त होऊ शकतात, तर शिवसेनेचे ३५ संख्याबळ असल्याने ४.५९ प्रमाणे ५ सदस्य नियुक्त होऊ शकतात. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने त्यांच्या एकूण १२ सदस्यांपैकी १.५७ म्हणजे दोन सदस्य स्थायीवर जाऊ शकतात. मात्र, विरोधकांची आघाडी करत भाजपाचे संख्याबळ ९ वरून ८ वर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी व आघाडी नोंदणीसंबंधी माहिती घेतली जात आहे. भाजपाचे ८ आणि विरोधकांचेही ८ सदस्य स्थायीवर नियुक्त झाल्यास समसमान संख्याबळ होऊन चिठ्ठी पद्धतीने विरोधकांचे सभापतिपदासाठी नशीब उजळू शकते, असे गणित मांडले जात आहे. परंतु, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली तरी त्यांचे सातच्या वर सदस्य नियुक्त होणार नाहीत, असा दावा भाजपाच्या सूत्रांकडून केला जात आहे. (प्रतिनिधी)