शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘कश्यपी’चे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 13, 2016 00:29 IST

प्रकल्पग्रस्तांची धरपकड : पोलीस ठाण्याला घेराव

नाशिक : कश्यपी धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळेच वळण लागून नोकरी नाही तर जमिनी परत द्या, अशी मागणी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी रविवारी सायंकाळी धरणात साचणारे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांनी आठ तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्वांना अटक करण्यासाठी घेराव घातला. कश्यपी धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली असून, शासन दरबारी फक्त आश्वासने मिळत असल्यामुळे वैतागलेल्या प्रकल्पग्रस्तांनी नोकरी नसेल तर जमिनी परत द्या, अशा धोशा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी कश्यपी धरणात साचलेले पाणी सोडून देण्याचा प्रयत्न कश्यपीनगरातील काही तरुणांनी केला. पाटबंधारे खात्याचे काही अधिकारी व कर्मचारी धरणावर गेले असता, त्यांना धरणाचे दरवाजे बंद करण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांची दखल घेत, तातडीने पोलीस व नाशिक तहसीलदारांना त्याची माहिती देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ग्रामस्थांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. सोमवारी नाशिक तहसीलदारांनी कश्यपीनगरला जाऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. याच दरम्यान, हरसूल पोलिसांनी सोमनाथ मोंढे, दगडू धोंडगे, प्रकाश बेंडकुळे, अंबादास खोडे, लक्ष्मण बेंडकुळे, महेंद्र बेंडकुळे, सूरज मोंढे, तुकाराम मोंढे या आठ जणांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या देवरगाव, धोंडेगाव, गाळोशी, कश्यपीनगर येथील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आदिवासी नेते हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकल्पग्रस्त तरुणांना अटक केल्याने संपूर्ण ग्रामस्थांनाही अटक करावी, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांची समजूत घालण्यात आली. दुपारी आठही तरुणांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)