शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चौथीच्या विद्यार्थ्यास ठार मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 16, 2016 22:44 IST

लासलगाव : पोलिसांत गुन्हा दाखल

लासलगाव : पिंपळगाव नजीक येथील चौथीत शिकत असलेल्या वैभव रघुनाथ पवार या विद्यार्थ्यास येथीलच दोन अल्पवयीन मुलांनी पेरू तोडण्याच्या बहाण्याने शिवनदीच्या परिसरात नेऊन त्याच्यावर दगडाने डोक्यावर मार करत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव नजीक येथील चौथीत शिकत असलेला विद्यार्थी वैभव रघुनाथ पवार ध्वजारोहणानंतर घरी आल्यावर परिसरात खेळत असताना त्याला तेथीलच दोन अल्पवयीन मुलांनी पेरू तोडण्याच्या बहाण्याने शिवनदीच्या परिसरात घेऊन गेले व त्याला बागेतून पेरू तोडून घेऊन ये असे सांगितले. मात्र तेथील ती बाग पेरूची नसून डाळिंबाची असल्याने तसेच नदीला पाणी असल्याने त्याने सदर दोन मुलांना विरोध केला. त्यानंतर सदर दोन मुलांनी त्याच्या डोक्यावर दगडाने हल्ला करत त्याला जबर जखमी केले. त्यानंतर या जखमी मुलाचे त्यांनी हात- पाय बांधून त्याचा नायलॉन दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथे कोणी तरी येते आहे याची चाहूल लागतात मुलांनी त्याला गाळात फेकून तेथून पळ काढला. त्यानंतर वैभवने सावरत जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी सदर मुलाच्या गळ्यावर वळ असल्याचे बघून त्याला स्वच्छ केले व सदर प्रकरणाची माहिती लासलगाव पोलीस स्टेशन येथे देऊन त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (वार्ताहर)