शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरपर्यंत योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: May 12, 2017 01:17 IST

सिन्नर : पाणीपुरवठा योजनेत आलेल्या अडीअडचणींवर मात करून उपाययोजना करण्यासाठी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली.

 लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : सिन्नरकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या नगरपरिषदेच्या कडवा पाणीपुरवठा योजनेत आलेल्या अडीअडचणींवर मात करून उपाययोजना करण्यासह व निधीची तरतूद करण्यासाठी मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. सिन्नर नगरपरिषदेच्या या योजनेसाठी विशेष बाब म्हणून १९ कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी याप्रसंगी केली. सिन्नर नगरपरिषदेच्या कडवा पाणीपुरवठा योजनेच्या अडीअडचणींबाबत आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हैसकर यांच्या दाालनात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक शैलेश नाईक, पंकज मोरे, प्रभाकर गोळेसर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व्यंकटेश दूर्वास, अभियंता सुनील पाटील उपस्थित होते. शहराला मुबलक पाणीपुुरवठा करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने कडवा धरण स्रोतातून पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. सदर योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या यू. आय. डी. एस. एस. एम. टी. या योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेची निविदा २३.९२ टक्के दराने मंजूर केल्याने योजनेची किंमत ६२ कोटींहून ८२.५६ कोटी इतकी झाली आहे. यामुळे योजना अडचणीत असल्याचे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच यू. आय. डी. एस. एस. एम. टी योजनेच्या आर्थिक आकृतिबंधानुसार केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान ८० टक्क्याहून ६० टक्के करण्यात आले आहे. तसेच नगरपालिकेचा हिस्सा १० वरून २० टक्के करण्यात आल्याने पालिकेवर १९ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आला आहे. या अडचणींसंदर्भात आमदार राजाभाऊ वाजे यांनी हिवाळी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या अनुदानावरील चर्चेप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिन्नर परिषदेच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर कडवा पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.